शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

न्यू इंडिया विमा कंपनीला ग्राहक न्यायमंचचा झटका

By admin | Updated: March 15, 2015 01:30 IST

सर्व कागदपत्रे सादर करूनही शवविच्छेदन अहवाल सादर न केल्याचे कारण समोर करून शेतकरी अपघात विमा नाकारणाऱ्या न्यू इंडिया विमा कंपनीला

गोंदिया : सर्व कागदपत्रे सादर करूनही शवविच्छेदन अहवाल सादर न केल्याचे कारण समोर करून शेतकरी अपघात विमा नाकारणाऱ्या न्यू इंडिया विमा कंपनीला ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने चांगलाच झटका दिला. यात मृत शेतकऱ्याच्या पत्नीला एक लाख रूपये विमा रक्कम, तक्रारीचा खर्च व नुकसान भरपाई ३० दिवसांत देण्याचे आदेश दिले.शेतकरी सहेसराम कारू नागपुरे (रा. इर्री) यांचा ३ फेब्रुवारी २०१२ रोजी दुचाकीवर मागे बसून जाताना दुचाकी घसरल्याने घडलेल्या अपघातात मृत्यू झाला. त्यांची पत्नी पार्वता नागपुरे यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा दावा न्यू इंडिया विमा कंपनीला सादर केला. मात्र उत्तरीय तपासणी अहवाल सादर न केल्याचे कारण सांगून कंपनीने दावा फेटाळला होता. त्यामुळे पार्वता नागपूर यांनी ग्राहक न्यायमंचात १६ सप्टेंबर २०१४ रोजी तक्रार दाखल केली. नोटिसेस बजावल्यावर विरूद्ध पक्ष सदर विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक व क्षेत्रीय व्यवस्थापकांनी उपस्थित राहून जबाब नोंदविला. तर गोंदियाचे तालुका कृषी अधिकारी अनुपस्थित असल्याने प्रकरण एकतर्फी चालविण्याचे आदेश मंचाद्वारे पारित करण्यात आले. विमा कंपनीच्या व्यवस्थापकांनी मृतक ट्रिपल सिट दुचाकीवर जात असल्याने मोटार वाहन नियमांचे उल्लंघन झाले व मृतदेहाचा उत्तरीय तपासणी अहवाल तक्रारकर्तीने सादर न केल्याने दावा फेटाळल्याचे नमूद केले. मात्र तक्रारकर्त्या पार्वताबाईंनी सर्व कागदपत्र सादर केले होते. तक्रारकर्त्यांच्या बाजूने अ‍ॅड. उदय क्षिरसागर व विमा कंपनीच्या बाजून अ‍ॅड. इंदिरा बघेले यांनी युक्तिवाद केला. त्यावर ग्राहक न्यायमंचने कारणमिमांसा करून शेतकरी या नात्याने विमा योजनेच्या लाभास पात्र असल्याचे सांगत तक्रार मंजूर केली. या न्यायनिवाड्यात पार्वता नागपुरे यांना त्यांच्या मृत पतीच्या अपघात विम्याचे एक लाख रूपये १६ सप्टेंबर २०१४ पासून दरसाल दरशेकडा नऊ टक्के व्याजाने द्यावे, शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी १० हजार रूपये, तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रूपये ३० दिवसांच्या आत द्यावे, असा आदेश ग्राहक न्यायमंचने न्यू इंडिया विमा कंपनीला दिला. (प्रतिनिधी)