शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा टार्गेट टॉप-५०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 23:26 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगर परिषदेने केलेल्या कामांची पाहणी करून त्यातील त्रुट्यांची दुरूस्ती करण्यासाठी परीक्षक-मार्गदर्शक म्हणून दिल्ली येथून एक व्यक्ती नगर परिषदेत पाठविण्यात आली आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत मिशन-२०१८ : त्रुट्यांच्या दुरूस्तीसाठी आले मार्गदर्शक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगर परिषदेने केलेल्या कामांची पाहणी करून त्यातील त्रुट्यांची दुरूस्ती करण्यासाठी परीक्षक-मार्गदर्शक म्हणून दिल्ली येथून एक व्यक्ती नगर परिषदेत पाठविण्यात आली आहे. नगर परिषदेने केलेल्या कामांची सर्वेक्षणानुरूप तंतोतंत तयारी करण्याची त्यांच्याकडे जबाबदारी आहे. असे करून नगर परिषदेला टॉप- ५० मध्ये आणण्याचा त्यांचा उद्देश आहे.आपला देश व प्रत्येक शहर स्वच्छ व सुंदर रहावे यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन सुरू केले आहे. यांतर्गत नगर परिषदांना मिशन अंतर्गत आखून देण्यात आलेल्या कामांची पूर्तता करायची आहे. त्यावरच त्यावरून शहरांची रँकींग केली जाणार आहे. आता स्वच्छ भारत मिशन-२०१८ ला सुरूवात झाली असून त्या दृष्टीने नगर परिषदा कामाला लागल्या आहे. त्यादृष्टीने कामकाज केले जात आहे. या कामांची पाहणी करून मार्गदर्शन करण्यासाठी मध्यंतरी राज्यस्तरीय समितीच्या दोन सदस्यांनी येथे येऊन नगर परिषद स्वच्छता विभागाला मार्गदर्शन केले होते. मात्र एवढ्यावरच अवलंबून राहणे उचीत नसल्यामुळे नगर परिषद स्वच्छता विभागाने केलेल्या कामांची पाहणी करून त्यात असलेल्या त्रुट्यांची पूर्तता करण्यासाठी व ही सर्व कामे आटोपून फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येत असलेल्या केंद्रीय समितीच्या सर्वेक्षणापुर्वी मिशनच्या आराखड्यानुसार सर्व कामे व कागदपत्र तयार ठेवण्यासाठी दिल्ली येथून राहूल शर्मा नामक परिक्षक-मार्गदर्शक येथील नगर परिषदेत आले आहेत. राज्य शासनाच्या मागणीवरून भारतीय गुणवत्ता नियंत्रण आयोगाकडून त्यांना पाठविण्यात आले आहे. केंद्रीय समितीच्या आगमनापर्यंत ते येथे राहणार असून नगर परिषदेच्या सर्व कागदपत्र व केलेल्या कामांची पाहणी करून त्यांना आराखड्यात तंतोतंत बसविण्यासाठी त्यांनी काम सुरू केले आहे.गोंदियाचा ३४३ वा क्रमांकस्वच्छ भारत मिशन अंतर्गत मागील वर्षी अवघ्या महाराष्ट्रालाच गालबोट लागले होते. यात गोंदियाचा ३४३ वा क्रमांक होता. यातून नगर परिषदेचा कारभार किती सुरळीत चालतो याची प्रचिती आली होती. आता स्वच्छ भारत मिशन- २०१८ सुरू झाले आहे. यात तरी माघारलेल्या या शहरांचा क्रमांक उंचावा व शहरांची स्थिती सुधारावी यासाठी राज्य शासनाकडून परीक्षक-मार्गदर्शक पाठवून स्वच्छता विभागाने केलेल्या कामांतील त्रुट्यांची दुरूस्ती करण्यासाठी ही सर्व धडपड सुरू असल्याचे दिसते. अशात यंदा नगर परिषद काय नेमके काय साध्य करते याकडे लक्ष लागले आहे.