शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

करंट लावून वन्यप्राण्यांची शिकार

By admin | Updated: March 10, 2016 02:28 IST

तिरोडा तालुक्याच्या इंदोरा परिसरात मागील अनेक दिवसांपासून करंट लावून वन्यप्राण्यांची शिकार केली जाते. या परिसरात ५ मार्च रोजी झालेल्या शिकारीचा छडा पिटरने लावला ...

पिटरने लावला रानडुकराचा शोध : वन्यप्राण्यांच्या सहा कवट्या जप्तगोंदिया : तिरोडा तालुक्याच्या इंदोरा परिसरात मागील अनेक दिवसांपासून करंट लावून वन्यप्राण्यांची शिकार केली जाते. या परिसरात ५ मार्च रोजी झालेल्या शिकारीचा छडा पिटरने लावला असून गोंदियावरुन गेलेल्या चमूने या प्रकरणात वन्यप्राण्यांच्या सहा कवट्या या परिसरातून हस्तगत केल्या आहे. मात्र आरोपीला वन्यकोठडी मिळावी यासाठी तेथील वनपरिक्षेत्राधिकारी चाटी यांनी प्रयत्न न केल्यामुळे अवघ्या ७ तासातच आरोपी जामिनावर सुटला आहे. इंदोरा परिसरात विद्युतच्या सहाय्याने करंट लावून वन्यप्राण्यांची शिकार केली जात असल्याची गुप्त माहिती उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांना मिळाली. या कारवाईत तिरोडा येथील उपवनसंरक्षक एम.के. चाटी आरोपीला सोडून देतील अशी गुप्त माहिती उपवनसंरक्षकांना मिळाल्याने त्यांनी गोंदियाचे वनपरिक्षेत्राधिकारी आनंद मेश्राम यांना कारवाईसाठी पाठवले. मेश्राम यांनी या प्रकरणाचा छडा लावून आरोपीला तिरोडा वनविभागाच्या स्वाधिन केले. परंतु सकाळी ११ वाजता अटक करण्यात आलेल्या आरोपीला अवघ्या ७ तासातच जामिनावर बाहेर येण्याची मुभा मिळाली. यामुळे वनाधिकारी वन्यजीवांची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना कसे अभयदान देते याची प्रचिती येते. हे प्रकरण थातूर मातूर दर्शविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे लक्षात येताच उपवनसंरक्षकांनी ७ मार्च रोजी गोंदिया येथील एक पथक तपासासाठी पाठविले. त्यांच्या सोबत पिटर नावाचा श्वानही पाठवला. या पिटरने शेतकऱ्याने रानडुकराची शिकार करून ज्या शेतात त्याला जमिनीत पुरुन ठेवले होते त्याचा शोध पिटरने लावला. शिकाऱ्याने रानडुकराची शिकार करून त्याला आपल्या शेतात खोलखड्यात पुरले होते. त्यावर लाखोडीचा ढिग तयार केला होता. परंतु पिटरने या प्रकरणाला उजेडात आणले. गोंदिया व तिरोडा येथील २५ ते ३० कर्मचारी, अधिकाऱ्यांनी इंदिरो परिसरातील ३०० हेक्टर वनपरिसर पिंजून काढून त्या परिसरात करंट लावून शिकार करण्यात आलेले वन्यप्राण्यांच्या सहा कवट्या शोधून काढल्या. हरिण, रानडुक्कर व इतर वन्यप्राण्यांच्या त्या कवट्या असाव्यात असा संशय येत आहे. (तालुका प्रतिनिधी)