शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
2
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
3
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
4
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
5
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
6
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
7
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
8
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
9
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
10
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
11
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
12
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
13
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
14
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
15
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
16
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
17
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
18
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
19
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
20
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!

घरकूल प्रकरणात कारवाई थंडबस्त्यात

By admin | Updated: November 16, 2014 22:51 IST

येथील वार्ड क्र.३ मध्ये घरकूल प्रकरणाची आठ महिन्यांपूर्वी चौकशी होऊन दोषी आढळल्यानंतरही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एका पंचायत समिती

पं.स. सदस्याचे दडपण : बीडीओंकडून सारवासारवअर्जुनी/मोरगाव : येथील वार्ड क्र.३ मध्ये घरकूल प्रकरणाची आठ महिन्यांपूर्वी चौकशी होऊन दोषी आढळल्यानंतरही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एका पंचायत समिती सदस्याच्या दडपणामुळे खंडविकास अधिकाऱ्यांनी कारवाई थंडबस्त्यात ठेवल्याचा आरोप रवि व्यंकटय्या कुदरुपाका यांनी केला आहे.प्राप्त माहितीनुसार, अर्जुनी/मोरगाव येथील वॉर्ड क्र.४ चे रहिवासी अरविंद मार्कंड बोरकर यांना २०१२ -१३ या वर्षात घरकूल मंजूर झाले. घरकुल मंजुरीचे वेळी लाभार्थ्याने वॉर्ड क्र. ४ येथील स्वत:च्या मालकीच्या वर्णनाचा ग्रामविकास अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेला नमूना ८ जोडला. मात्र वॉर्ड क्र. ४ येथील स्वत:च्या मालकीच्या जागेत घरकुलाचे बांधकाम न करता वॉर्ड क्र. ३ (बरडटोली) येथील शासकीय जागेवर बांधकाम केले.बांधकामासाठी लागणारे साहित्य व मजुरीची रक्कम अदा करण्यासाठी लाभार्थ्यांने पं.स.कडे अनुदानाची मागणी केली. सरपंच व ग्राम सचिवाने सहमती दर्शविल्यामुळे लाभार्थ्याला धनादेश क्रमांक ४२२३२ नुसार ३१ जुलै २०१३ रोजी २५ हजार रुपयांचे प्रथम अग्रीम अदा करण्यात आले. ग्रा.पं.चे ग्राम विकास अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या घरकूल बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली. फाऊंडेशन पर्यंत बांधकाम झाल्याचे प्रमाणपत्र ३ जुलै २०१३ रोजी दिले. या आधारावर पं.स. ने धनादेश क्रमांक ४२३३० नुसार आणखी २५ हजारांचे दुसरे अग्रीम २३ आॅगस्ट २०१३ रोजी लाभार्थ्याला दिले.बरडटोली येथील रहिवासी रवि कुदरुपाका यांनी लाभार्थी व ग्राम विकास अधिकाऱ्यांनी शासनाची दिशाभूल केल्यामुळे त्यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची लेखी तक्रार संबंधित विभागाचे अधिकारी व पोलीसांकडे केली. या आधारावर खंड विकास अधिकाऱ्यांनी कनिष्ठ अभियंता टी.पी. कचरे व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आर.एम. इंगळे यांना मौका तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. १९ एप्रिल रोजी अहवाल सादर करण्यात आला. यात लाभार्थी व ग्राम विकास अधिकाऱ्यांना प्रथमदर्शनी दोषी ठरविण्यात आले. २२ एप्रिल रोजी सचिव ग्रा.पं. अर्जुनी/मोरगाव यांना स्पष्टीकरण विचारण्यात आले. त्यांनी १४ मे रोजी स्पष्टीकरण सादर केले. यात लाभार्थ्यांने ज्या ठिकाणी घरकुल बांधकाम करायला पाहिजे होते त्या ठिकाणी केले नाही. त्यांनी दिशाभूल केल्याने पोलीसात तक्रार नोंद करण्याचे कळविले.लाभार्थ्याला यापुढील धनादेश देण्यात येऊ नये असे ग्रा.पं.ने पंचायत समितीला कळविले. त्यानुसार लाभार्थ्याची पुढील देयके अडविण्यात आली. मात्र एक पंचायत समिती सदस्य ही देयके काढून घेण्यासाठी संबंधित यंत्रणेवर दडपण आणत आहे. प्रकरणी वरिष्ठांकडे अहवाल पाठविला आहे. त्याचा अभिप्राय झाल्यानंतर कारवाई करू असे खंड विकास अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांनी संबंधितांविरुद्ध शासकीय नियमाप्रमाणे प्रशासकीय कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश १७ सप्टेंबर रोजी खंड विकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. याला दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही यासंदर्भात कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यात कुठेतरी पाणी मुरत असल्याचा आरोप कुदरुपाका यांनी केला आहे. वरिष्ठांनी याप्रकरणी दखल घेण्याची मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)