शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेला २३२ कोटींच्या पीककर्जाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 21:42 IST

खते, बी-बियाणे, मजुरी आणि मशागतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज भासते. यासाठी शेतकऱ्यांना नातेवाईक अथवा सावकारापुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये यासाठी नाबार्ड आणि शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले जाते. पीक कर्जाचे वाटप एप्रिल महिन्यापासूनच सुरू केले जाते. यंदा खरीप हंगामासाठी सर्वाधिक २३२ कोटी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट हे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा २ लाख ७ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात येणार आहे. खरीप हंगामादरम्यान शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अडचण जाणवू नये यासाठी शासन आणि नाबार्ड जिल्हा आणि राष्ट्रीयीकृत बँकेच्या माध्यमातून पीककर्ज उपलब्ध करुन देते. यंदा जिल्हा, राष्ट्रीयीकृत आणि ग्रामीण बँकेला खरिपात ४०० कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट शासनाने दिले आहे. जिल्ह्यात खरिपात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. खते, बी-बियाणे, मजुरी आणि मशागतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज भासते. यासाठी शेतकऱ्यांना नातेवाईक अथवा सावकारापुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये यासाठी नाबार्ड आणि शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले जाते. पीक कर्जाचे वाटप एप्रिल महिन्यापासूनच सुरू केले जाते. यंदा खरीप हंगामासाठी सर्वाधिक २३२ कोटी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट हे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिले आहे. तर राष्ट्रीयीकृत बँकांना ९५ कोटी १९ लाख रुपये, ग्रामीण बँकेला ४८ कोटी खासगी बँकांना २३ कोटी ३० लाख व स्मॉल बँकांना १ कोटी ४२ लाख रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. जिल्हा बँकेने पीक कर्ज वाटपात आघाडी घेतली असून आतापर्यंत ८ ते १० हजारांवर शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप केले आहे. तर राष्ट्रीयीकृत बँका या नेहमीप्रमाणेच पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आतापर्यंत नेमके किती शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे ते शुक्रवारी स्पष्ट होणार असल्याचे सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

धान खरेदीने केली शेतकऱ्यांची कोंडी - केंद्र शासनाने अद्यापही धान खरेदीची मर्यादा वाढवून न दिल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. तर खरिपासाठी कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करुन हंगाम करण्याची वेळ आली आहे. तर रब्बीतील धान घरात ठेवण्याचीसुद्धा समस्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे.  

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज