शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू विक्रेत्यांवर गुन्हा

By admin | Updated: March 13, 2017 00:18 IST

जिल्हा पोलिसांनी शनिवारी विविध ठिकाणी धाड घालून अवैध दारू विक्रेत्यांकडून दारु जप्त केली.

गोंदिया : जिल्हा पोलिसांनी शनिवारी विविध ठिकाणी धाड घालून अवैध दारू विक्रेत्यांकडून दारु जप्त केली. ही कारवाई होळीच्या एक दिवसापूर्वी (दि.११) रोजी करण्यात आली. तिरोडाच्या संत रविदास वार्डातील रुपवंता ईश्वर बरियेकर (३४) या महिलेने मोहफुलापासून दारू गाळण्यासाठी ४ हजार रूपये किंमतीचे ८ पोती मोहफुल साठवून ठेवले होते. ते जप्त करण्यात आले. याच गावातील चंद्रशिला श्रावण कनोजे (५०) या महिलेने ६ हजार रूपये किंमतीचे १२ पोती मोहफुल साठवून ठेवले होते. तेही जप्त करण्यात आले. येडमाकोट येथील विरेंद्र किसन लिल्हारे (३१) याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली. आंबेडकर चौक कुडवा येथील सुखचंद सुखलाल हट्टेवार (४५) याच्याकडून ६ नग देशी दारुचे पव्वे, गल्लाटोला (पिपरीया) येथील संदीप सुभाष चौरागडे (३०) याच्याकडून ५ नग देशी दारुचे पव्वे, डुग्गीपार पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या सौंदड येथील संतोष राजीराम बनकर (२१) याच्याकडून १८० मिलीचे १९२ देशी दारुचे पव्वे एमएच३५/एसी-५७०९ या मोटर सायकलवर वाहून नेताना पकडण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या दारुची किंमत ९ हजार ६०० रुपये तर मोटरसायकलची किंमत ५० हजार रुपये सांगीतली जाते. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या तुमखेडा येथील महेश गोवर्धन सहारे (३२) याच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारु, दवनीवाडा पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या बलमाटोला येथील मच्ंिछद्र सुखचंद डोंगरे (४९) याच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारु, पिंडकेपार येथील गणेश शालीकराम लाळे (३४) याच्याकडून ६ लिटर हातभट्टीची दारु, बंडू चौक संजय नगर येथील नसीर गफूर शेख (३३) याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु, गंगाझरी पोलिसांनी कोहका येथील ओमप्रकाश लिखचंद लमाहे (३६) याच्याकडून २ लिटर हातभट्टीची दारु, गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तेढा येथील संतोष दशरथ वाघमारे (४७) याच्याकडून ८ नग देशी दारुचे पव्वे तर धनलाल भैय्यालाल शेंडे (५६) याच्याकडून ८ नग देशी दारुचे पव्वे जप्त करण्यात आले. सालेकसा पोलिसांनी शिकारीटोला येथील झनकलाल अनंतराम टेकाम (४५) याच्याकडून ६ लिटर हातभट्टीची दारु, अर्जुनी-मोरगाव येथील अजया रामय्या मलेवार (५४) याच्याकडून १० नग देशी दारुचे पव्वे, गोंदिया शहर ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुंभारेनगरातील मोहन महादेव ढेंगे (४९) याच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारु, पिंडकेपार येथील बाळकृष्ण रामा मरकाम (४९) याच्याकडून ४ लिटर हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली. सदर घटनेसंदर्भात आरोपीविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)