१ नोव्हेंबर २०१५ ते ५ एप्रिल २०२१ पर्यंत मुंडीपार येथे आरोपी आनंदराव भैयालाल बिजेवार यांची जागा भाडे करारनाम्याने घेतली होती. आनंदराव यांच्या संमती व परवानगी शिवाय आरोपींनी आपापसात संगनमत करून ती जागा आरोपी एकाने दुसऱ्या आरोपीला वापरण्यास दिली. जागा भाडे करार झाल्यापासून तक्रारदार यांना कोणतेही भाडे दिले नाही. त्यामुळे आनंदराव यांची आर्थिक फसवणूक केली. करार संपल्यानंतर सुद्धा सदर जागेवर जबरदस्तीने कब्जा केला. ही जागा परत मागितली असता आरोपींनी आनंदराव यांना शिवीगाळ करून त्यांना व त्यांच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेसंदर्भात गंगाझरी भादंविच्या कलम ४२०,४५२,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक टिळेकर करीत आहेत.
भाड्याच्या जागेवर कब्जा करणाऱ्या मुंडीपार येथील आरोपीवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:47 IST