शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

घरकुल गेले चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:00 IST

ब्राम्हणटोला येथील रहिवासी नरहरी फुंडे यांना प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल मंजूर झाले. २०१७-१८ च्या ऑनलाईन यादीत त्यांचे नाव आहे.पंचायत समिती कार्यालयातर्फे त्यांना मंजुरीचे पत्र देण्यात आले नाही.घरकुल मंजुरीचे पत्र मिळाले नाही म्हणून त्यांनी फाईल कार्यालयाकडे सादर केली नाही.

ठळक मुद्देसंडे अँकर । लाभ मिळाला नाही, पैसे दुसऱ्याच्याच खात्यात

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : घरकुल चोरीला जाऊ शकते ! विश्वास बसत नाही ना? पण हे अगदी खरे आहे.बाराभाटी ग्रामपंचायत अंतर्गत ब्राम्हणटोला येथील नरहरी केवळराम फुंडे यांचे घरकुल चोरीला गेले आहे.चोरीची अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार झाली नाही. मात्र हे घरकुल कुणी पळविले या चमत्काराचा शोध पंचायत समिती घेत आहे.ब्राम्हणटोला येथील रहिवासी नरहरी फुंडे यांना प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल मंजूर झाले. २०१७-१८ च्या ऑनलाईन यादीत त्यांचे नाव आहे.पंचायत समिती कार्यालयातर्फे त्यांना मंजुरीचे पत्र देण्यात आले नाही.घरकुल मंजुरीचे पत्र मिळाले नाही म्हणून त्यांनी फाईल कार्यालयाकडे सादर केली नाही.वर्षभरापूर्वीपासून ते घरकुलची स्वप्नं रंगवीत आहेत.मात्र घरकुल मिळेना. घरकुलाचे काम ऑनलाइन झाले आहे. साधारण व्यक्तीलाही बघता येते. घराशेजारी कुणीतरी पाहुणा म्हणून आला. त्याला हे बघता येत होते. फुंडे यांनी सहज त्याला अद्याप घरकुल मिळाले नाही त्याची काय स्थिती आहे. ते बघण्यासाठी सांगितले.त्याने बघितले आणि आश्चर्याचा धक्काच बसला.आॅनलाइन प्रणालीत त्यांचे घरकुल तयार होऊन त्यांना १ लाख ३० हजार रु पये मिळाल्याचे दर्शविण्यात आले आहेत. प्रत्यक्षात मात्र फुंडे यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही आणि घरकुलही झाले नाही. त्यांनी थेट पंचायत समिती कार्यालयात संपर्क साधला. घडलेला प्रकार गटविकास अधिकारी यांना सांगितला. त्यांनी लेखी तक्र ार करण्यास सांगितले. तक्र ार करण्यात आली. गट विकास अधिकारी मयूर आंदेलवाड, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक चौधरी यांनी बुधवारी बाराभाटी येथे जाऊन चौकशी केली.फुंडे यांच्या बँक खात्यात पैसे जमा न होता हे पैसे राष्ट्रपाल माने यांच्या खात्यात जमा झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पैशाची घरकुल प्रणालीच्या आॅनलाईन दस्तावेजात फुंडे यांचे नावे नोंद झाली आहे.हा अफलातून चमत्कार आहे. कसलाही कारभार केला नसतांना फुंडे यांचे नावे एकदा नोंद झाल्यामुळे त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही. अभियंत्यांच्या चुकीमुळे या योजनेपासून वंचित राहण्याची वेळ त्यांचेवर आली आहे. इतर घरकुलातही आणखी घबाड असण्याची शक्यता नाकारता येत नाही.अर्जुनी मोरगाव पंचायत समिती अंतर्गत सर्वच घरकुलांची विशेष यंत्रणेमार्फत चौकशी करणे गरजेचे आहे.अभियंत्यांचा कंत्राट संपलाघरकुल योजनेच्या कामासाठी खासगी संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक पंचायत समिती कार्यालयात कंत्राटी अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली आहे.या प्रकरणात कंत्राटी अभियंता कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.मात्र या अभियंत्यांचा कंत्राट सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच संपला आहे.त्यामुळे यासाठी कुणाला जबाबदार धरले जाते हा प्रश्न ऐरणीवर आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना