शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकावर पादचारी मार्ग व उड्डाणपूल तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 20:57 IST

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव रेल्वेस्थानकावर उड्डाणपूल व पथरस्ता नसल्यामुळे रेल्वे प्रवाशांची फारच गैरसोय होत आहे. प्लॅटफार्म क्र.२ वरुन प्लॅटफार्म क्र.१ वर जाण्यासाठी कुठलाही मार्ग नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना एका प्लॅटफार्मवरुन दुसऱ्या प्लॅटफार्मवर जाण्यासाठी रेल्वे रुळावरुन जावे लागते.

ठळक मुद्देनागरिकांची मागणी : रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष, प्रवाशांची गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव रेल्वेस्थानकावर उड्डाणपूल व पथरस्ता नसल्यामुळे रेल्वे प्रवाशांची फारच गैरसोय होत आहे. प्लॅटफार्म क्र.२ वरुन प्लॅटफार्म क्र.१ वर जाण्यासाठी कुठलाही मार्ग नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना एका प्लॅटफार्मवरुन दुसऱ्या प्लॅटफार्मवर जाण्यासाठी रेल्वे रुळावरुन जावे लागते.रेल्वे रुळापासून प्लॅफार्मची उंची जास्त असल्यामुळे चढताना व उतरताना प्रवाशांना फारच त्रास सहन करावा लागतो. यामुळे ज्येष्ठ नागरिकांची फारच गैरसोय होते. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेवून देवलगाव रेल्वे स्थानकावर उड्डाणपूल व पथमार्ग तयार करण्याची मागणी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.नवेगावबांधचे सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी रेल्वे अधिकाºयांकडे अनेकदा पत्रव्यवहार करून देवलगाव रेल्वे स्टेशनवर उड्डाणपूल व पथमार्ग तयार करण्याची मागणी केली होती. परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षरीनिशी निवेदन सुध्दा रेल्वे अधिकाऱ्यांना दिले होते. तेव्हा रेल्वे अधिकाºयांनी पदचारी मार्ग लवकरच तयार करण्याचे पत्र सुध्दा दिले होते. मात्र एक वर्षाचा कालावधी लोटूनही हा पदचारी मार्ग अद्यापही तयार करण्यात आला नाही.रेल्वे मार्ग ओलांडून जाणे हा रेल्वेच्या नियमानुसार गुन्हा आहे. मात्र पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांना या नियमाचे उल्लघंन करावे लागत आहे.वर्षभराचा कालावधी लोटूनही पादचारी मार्ग आणि उड्डाणपूल तयार करण्याचे कामे रेल्वे प्रशासनाने सुरु केले नाही. त्यामुळे नवेगावबांध येथील नागरिकांमध्ये रेल्वे प्रशासनाप्रती रोष व्याप्त आहे.देवलगाव रेल्वे स्टेशनवर प्लॅटफार्मचे विस्तारीकरण झाले. प्लॅटफार्म अधिक उंच झाले. त्यामुळे एका प्लॅटफार्मवरुन दुसऱ्या प्लॅटफार्मवर जाण्यासाठी तसेच तिकीट घराकडे जाण्यासाठी रेल्वे प्रवाशांना विशेषत: वृद्ध प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. रेल्वे प्रशासनाकडे पादचारी मार्ग व उड्डाणपूल तयार करण्याची मागणी केली होती.मात्र अद्यापही कामाला सुरूवात झाली नाही.- अनिरुद्ध शहारे,सरपंच ग्रामपंचायत नवेगावबांध..............................उड्डाणपुलाचे काम सुरु आहे ते लवकर पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहे. प्रवाशांना जेवढ्या चांगल्या सुविधा देता येतील त्या देण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाचा आहे.- रामदेव उरॉव,स्टेशन मास्टर देवलगाव रेल्वे स्टेशन