शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

६ आॅक्टोबरच्या आदेशाला न्यायालयाचा स्थगनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:40 IST

जिल्हा वार्षीक योजनेअंतर्गत लेखाशिर्ष ३०.५४ व ५०.५४ मधून जिल्हा परिषदांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळत होता. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने ६ आॅक्टोबर २०१८ ला शासन निर्णय घेवून जि.प.चे अधिकार काढून पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन त्या समितीला दिले होते.

ठळक मुद्दे३०.५४ व ५०.५४ लेखाशिर्ष निधीचा वाद : उच्च न्यायालयाचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा वार्षीक योजनेअंतर्गत लेखाशिर्ष ३०.५४ व ५०.५४ मधून जिल्हा परिषदांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळत होता. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने ६ आॅक्टोबर २०१८ ला शासन निर्णय घेवून जि.प.चे अधिकार काढून पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन त्या समितीला दिले होते.त्यामुळे या निर्णयाविरोधात जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, किशोर तरोणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने या आदेशाला सोमवारी स्थगनादेश दिला. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत लेखाशिर्ष ३०.५० व ५०.५४ अंतर्गत जिल्हा मार्ग व इतर मार्ग यांच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळत असते. या निधीतून रस्त्यांची कामे जि.प.सदस्य प्रस्तावित करीत असून बांधकाम समिती, स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्रस्तावित केलेल्या यादीला मंजूरी दिल्यावर ही यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजूरीसाठी पाठविली जात होती. ते या यादीला मंजूरी देत होते.मात्र राज्य शासनाने पूर्वीचे सर्व शासन निर्णय रद्द करुन लेखाशिर्ष ३०.५७ व ५०.५४ अंतर्गत मिळणारा निधी खर्च करण्यासाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय ६ आॅक्टोबरला घेतला. या समितीत पालकमंत्री यांनी मान्यता दिलेले २ आमदार व जिल्हाधिकारी सदस्य तर मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सदस्य यांचा समावेश केला. शासन एवढ्यावरच थांबले नाही तर सक्षम असलेल्या जि.प.सार्वजनिक बांधकाम विभागाला कामे द्यायचे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकारही समितीला दिला.दरम्यान या निर्णयामुळे राज्यातील जि.प.सदस्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. दरम्यान या निर्णया विरोधात जि.प.सदस्य परशुरामकर व तरोणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले. यावर आज न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्यायमूर्ती एस.एम.मोडक यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने प्रकरण ऐकून घेत ६ आॅक्टोबर २०१८ चे शासन निर्णयास स्थगनादेश दिला.सरकारने स्थापन केलेल्या समितीने निधी खर्च करण्याचे नियोजन केले असेल तर त्यालाही स्थगनादेश देऊन पुढील सुनावणी २९ नोव्हेंबरला ठेवली आहे. या प्रकरणात परशुरामकर व तरोणे यांच्या वतीने अ‍ॅड. शरीफ यांनी काम पाहिले.