शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
2
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
3
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
4
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
5
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
6
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
7
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
8
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
9
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
10
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
11
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
12
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
13
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
14
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
15
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
16
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं
17
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
18
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
19
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
20
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!

देशविघातक कृत्यांना सडेतोड उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 9:03 PM

देश विकासाच्या वाटेवर सतत अग्रेसर आहे. परंतु आपल्या देशाचे शत्रू देशात घातपात घडविण्यासाठी मनसुबे आखत राहतात. आपले सरकार वेळीचे त्यांचे मनसुबे हाणून पाडून आपल्या सक्रितेचा परिचय देते. जे जवान देश रक्षण करताना शहीद झाले त्या भारत मातेच्या पुत्रांचे बलीदान व्यर्थ जाणार नाही.

ठळक मुद्देपालकमंत्री राजकुमार बडोले यांचे प्रतिपादन : पदमपूर येथे ‘एक शाम शहिदों के नाम’ कार्यक्रम थाटात

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : देश विकासाच्या वाटेवर सतत अग्रेसर आहे. परंतु आपल्या देशाचे शत्रू देशात घातपात घडविण्यासाठी मनसुबे आखत राहतात. आपले सरकार वेळीचे त्यांचे मनसुबे हाणून पाडून आपल्या सक्रितेचा परिचय देते. जे जवान देश रक्षण करताना शहीद झाले त्या भारत मातेच्या पुत्रांचे बलीदान व्यर्थ जाणार नाही. देशातील जनता त्यांची चिरकाल आठवण ठेवणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा विशेष सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.ग्राम पदमपूर येथील यशोदा बहुउद्देशीय विकास संस्था व उडाण बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या संयुक्तवतीने शुक्रवारी (दि.२६) पदमपूर येथील राष्टÑसंत तुकडोजी चौकात ‘एक शाम शहिदों के नाम’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा महिला बँकेच्या अध्यक्ष डॉ. माधुरी नासरे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) राजेश बागडे, सामाजिक कार्यकर्ता अंजली जांभूळकर व यशवंत प्रामुख्याने मानकर उपस्थित होते.या वेळी दीनदुबळ्यासांठी असलेल्या समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती ना. बडोले यांनी दिली. शहीद भगतसिंग व महाकवी भवभूती यांच्या प्रतिमांच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. देशभक्ती गीतांवर समूह व एकल नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हाधिकारी यांच्या पत्नी सई काळे यांनी कार्यक्रमात उपस्थिती दर्शवून नागरिकांना संबोधित केले. जिल्ह्यातील विविध तालुक्यातून तसेच नागपूर, भंडारा या शहरातील स्पर्धकांनी २० समूह नृत्य व २२ एकलनृत्य सादर केले. स्पर्धेप्रसंगी तहसीलदार साहेबराव राठोड, पोलीस निरीक्षक शशीकांत दसुरकर, मुख्याध्यापक शरद उपलपवार यांनी उपस्थित होते. प्रास्ताविक नरेश रहिले यांनी मांडले.संचालन सुनंदा हुकरे व रामभरोस चक्रवर्ती यांनी केले. आभार आशिष तलमले यांनी मानले. कार्यक्रमासाठी हरीश भुते, नरेश बोहरे, दीपक भांडारकर, अतुल फुंडे, रविकांत पाऊलझगडे, शैलेश लक्षणे, प्रतिक करंडे, प्रेमानंद पाथोडे, दिनेश गिºहेपुंजे, सुनिल हुकरे, प्रिनल वंजारी, हिमालय राऊत, महेंद्र गिºहेपुंजे, प्रदीप कावरे, जीवन फुंडे, राकेश नेवारे, गोविंद बहेकार, राकेश शिवणकर, मुकेश शिवणकर, उज्वल वंजारी, कुलदीप हुकरे, सचिन तलमले, शांतनू तावाडे, मनोज कावरे, हाार्दीक भुते, अरविंद भुते व इतरांनी सहकार्य केले.शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सत्कार‘एक शाम शहीदोंके नाम’ या कार्यक्रमात शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री तसेच विशेष सामाजिक न्यायमंत्री बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी लढा देताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. शहीद झालेले पोलीस उपनिरीक्षक दीपक रहिले यांच्या पत्नी पुष्पा दीपक रहिले, बेवारटोला नक्षलस्फोटात शहीद झालेले मुलचंद भोयर यांचे वडील शामराव भोयर व आई राधिका भोयर, बेवारटोला नक्षलस्फोटात शहीद झालेले भोजराज बाभरे यांचे वडील शंकर बाभरे व आई राईबाई बाभरे, गडचिरोली जिल्ह्याच्या मोठा झालीया येथे शहीद झालेले ईशांतकुमार भुरे यांचे वडील रामरतन भुरे व आई शीला भुरे यांचा व इतर शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.