शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय कामात भ्रष्टाचार

By admin | Updated: September 26, 2016 01:57 IST

तिरोडा तालुक्यातील जमुनिया येथील ग्रा.पं. गेल्या काही वर्षापासून भ्रष्टाचाराच्या दलदलीत फसलेली असताना आता नुकताच शौचालय बांधकाम ...

जमुनिया येथे : तपासाच्या नावे अधिकारी करतात ग्रामस्थांची दिशाभूलकाचेवानी : तिरोडा तालुक्यातील जमुनिया येथील ग्रा.पं. गेल्या काही वर्षापासून भ्रष्टाचाराच्या दलदलीत फसलेली असताना आता नुकताच शौचालय बांधकाम भ्रष्टाचाराचा प्रकरण गावात तापला आहे. काही पदाधिकाऱ्यांच्या दबावात अधिकारी ग्रा.पं.ला येवून तपासाच्या नावावर जनतेची दिशाभूल करून खोटे अहवाल तयार करत असल्याने पुन्हा हे प्रकरण तापणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. जमुनिया ग्रा.पं. अंतर्गत ७० शौचालय बांधकामाकरिता १९ सप्टेंबर २०१५ रोजी ८ लाख ४० हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. यापैकी ४७ बांधकाम पूर्ण झाल्याचे सांगून १२ हजार रुपयेप्रमाणे लाभार्थ्यांना देण्यात आले असल्याचे शासकीय अभिलेख दर्शवत आहे. परंतु नागरिकांनी ग्रामपंचायत सचिव एस.एम. भेलावे आणि सरपंच किरण बंसोड यांनी शासनाच्या परिपत्रकातील नियमाला धाब्यावर ठेवून शासन निधीचा दुरुपयोग केल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाला केली आहे. ज्यांना घरकूल देण्यात आले त्यांनाही शौचालय बांधकामाचे धनादेश देण्यात आले आहेत. शौचालय बनले नसताना त्यांच्या नावाने धनादेश तयार करणे, विस्तार अधिकारी पंचायत समिती यांनी चौकशी न करता कार्यालयात बसून खोटा अहवाल तयार करून नागरिकांची दिशाभूल केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. शेकडो कुटूंबप्रमुखांनी हस्तलिखीत निवेदनात गैरकार्य आणि भ्रष्टाचाराची कारणे दर्शवून तक्रार खंड विकास अधिकारी तिरोडा यांना १३ जून २०१६ ला अर्ज दिले होते. यावर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. तक्रारकर्त्यांनी तिरोडा क्षेत्राचे आ. विजय रहांगडाले यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी पत्र क्र.४४८, दि. ४ जुलै २०१६ नुसार प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. खंड विकास अधिकारी वाघमारे यांनी चौकशी अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी (पंचायत) यांच्याकडे दिले. त्यांनी गट समन्वयक छाया बोरकर यांना ग्रा.पं.येथे जावून चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले. मात्र सदर गट समन्वयक यांनी तिरोडा येथील एक महिला जि.प. सदस्याच्या दबावाखाली सरपंच किरण बंसोड आणि ग्रामसेवक भेलावे यांना वाचविण्याकरिता ग्रामपंचायतमध्ये न येता तसेच घरोघरी जाऊन तपासणी न करता २२ आॅगस्ट २०१६ ला पूर्णत: खोटा अहवाल तयार करून सादर केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांनी १८ आॅगस्टला प्रहार संघटनेच्या तक्रारीवरून व आ. विजय रहांगडाले यांच्या पत्रावरून घरकूल आणि शौचालयासंबंधी चौकशी करण्याचे आदेश गट विकास अधिकारी तिरोडा यांनी दिले होते. २५ जुलै २०१६ रोजी गट समन्वयक छाया बोरकर यांनी ग्रा.पं. जमुनिया येथे जावून चौकशी केल्याचे सांगितले. मात्र गावकऱ्यांनी हे खोेटे असल्याचे सांगितले. गट समन्वयक छाया बोरकर यांनी १९ आॅगस्ट २०१६ ला सरपंच किरण बंसोड आणि ग्रामसेवक एस.एम. भेलावे यांच्या उपस्थितीत चौकशी केल्याचे सांगितले. परंतु हेसुध्दा बनवाबनवी असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. तक्रारकर्त्या नागरिकांशिवाय गट समन्वयक छाया बोरकर यांनी चौकशी केली कशी? तक्रारकर्त्यांना का बोलावले नाही? नागरिकांच्या घरी जावून घरकूल आणि शौचालयांची पाहणी का केली नाही? असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहेत. ६ सप्टेंबर २०१६ रोजी गौतम दामा गेडाम व इतर ३६ ग्रामस्थांनी बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची तक्रार उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांना केली आहे.(वार्ताहर)