शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोच्या कामात भ्रष्टाचार

By admin | Updated: September 21, 2015 01:42 IST

पं.स. आमगाव अंतर्गत ग्रामपंचायत जवरी येथे रोजगार हमीच्या कामात बोगस मजुरांची हजेरी दर्शवून शासन ...

बोगस मजुरांची हजेरी : जवरी येथे केली पैशाची उचलकालीमाटी : पं.स. आमगाव अंतर्गत ग्रामपंचायत जवरी येथे रोजगार हमीच्या कामात बोगस मजुरांची हजेरी दर्शवून शासन तिजोरीला लाखोंचा चुना लावल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तशी तक्रार जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे. आमगाव तहसील अंतर्गत जवरी येथे २०१४ ते १५ या कालावधीत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत हनुमान मंदिर जवळील मालगुजारी तलाव, चौकी तलाव खोलीकरण, नाला सरळीकरण, भात खाचर, साठवण बंधारा, वृक्ष लागवड, शतकोटी वृक्ष लागवड व सिंचन विहीर बांधकाम करण्यात आले. सदर कामे ग्रा.पं. अंतर्गत करण्यात आले. सदर कामात मजुरांची बोगस नावे चढवून मोठ्या प्रमाणात लाभार्थी व संबंधित प्रशासनाने ‘अर्धे तुम्ही-अर्धे आम्ही’ या प्रमाणे शासन निधीवर डल्ला मारला. जवरी येथील चंद्रकुमार गायधने यांनी माहितीचा अधिकारांतर्गत संबंधित मस्टरची माहिती मागितली. त्यात १० मजुरांचे नाव गहाळ करण्यात आले. तसेच एमबी रेकार्डवर क्रमांक नाही, पेज क्रमांक नाही, रोजगार सेवकाची स्वाक्षरी नाही. ग्रामसेवकाची तसेच गट कार्यक्रम अधिकारी यांची स्वाक्षरी नाही. तरीदेखील मस्टर मंजूर करण्यात आले. यात मजूर धनराज हटवार हे गृहरक्षक दलात कार्यरत आहेत व २६ जून ते १ जुलैपर्यंत निवडणूक बंदोबस्तासाठी पोलीस ठाणे आमगावला कार्र्यरत होते. पण मस्टरमध्ये २४ जून ते ३० जून १५ पर्यंत हजेरी लावण्यात आली. हे कसे शक्य होईल? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच शामलाल मेंढे सिंचन विहिरीवर कामावर नसून कुल्पा-कारंजा येथे वीटभट्टीच्या कामावर रुजू असताना त्यांचे नाव मस्टरमध्ये आहे आणि मजुरीही काढण्यात आली. तसेच बकाराम गायधने या मजुराला मस्टर क्रं. २२७० मध्ये सात दिवसांचे दोन हजार ६७० रुपये कोणत्या आधारावर मंजूर करण्यात आले, याबाबत चौकशी व्हावी. रोजगार सेवकाची मुलगी मोहिनी अशोक गायधने शिक्षण घेत आहे, पण गावातील रोहयोच्या प्रत्येक कामावर हजेरी लावण्यात आली. तसेच अमृत गायधने, सरस्वता हत्तीमारे, आशा दिवाळे, वर्षा अशोक डोये, ईश्वर गायधने, दुलीचंद पाथोडे, अमोल गायधने, ज्योती तिरपुडे, मनिराम फुंडे, राधेश्या बकाराम गायधने, मुलचंद गायधने, श्यामलाल मेंढे, शकुंतला मेंढे आदी मजुरांची बोगस हजेरी लावून पैशाची उचल करण्यात आली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सदर रोहयोच्या कामावर सिमेंट व इतर साहित्य ने-आण करण्यासाठी बाबुलाल गायधने यांची बैलबंडी उपयोगात आली. पण या संबंधीची हजेरी धनराज हटवार यांच्या नावे काढण्यात आली. असे बोगस मस्टर तयार करण्यात आले. सदर रोहयो कामात मस्टरमध्ये निवडणूक दिवशी, आढवडी बाजाराच्या दिवशी सुट्टी असते. परंतु हजेरीपट क्रं. ३७०४ मध्ये सातही दिवस चक्क हजेरी दर्शविण्यात आली. सदर भोंगळ कारभार तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. (वार्ताहर)