शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

ओबीसी बेरोजगारांसाठी महामंडळाची थेट कर्ज योजना

By admin | Updated: December 13, 2014 22:41 IST

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या वतीने इतर मागासवर्गीय प्रवर्गातील युवक-युवतींना स्वयंरोजगाराकरीता विविध कर्ज विषयक योजना राबविण्यात येतात.

गोंदिया : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या वतीने इतर मागासवर्गीय प्रवर्गातील युवक-युवतींना स्वयंरोजगाराकरीता विविध कर्ज विषयक योजना राबविण्यात येतात. याअंतर्गत स्वयंरोजगाराकरिता महामंडळाने २५ हजार रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजना लागू केली आहे.या योजनेअंतर्गत पानठेला, चहाटपरी, भाजीपाला विक्री, सायकल दुरुस्ती अशा पद्धतीचे किरकोळ व छोटे व्यवसाय सुरु करण्यासाठी इतर मागासवर्गातील महिला व पुरुष लाभार्थ्यांना २५ हजार रुपयापर्यंतचे कर्ज थेट उपलब्ध करुन देण्यात येते. यात बँकेमार्फत कर्ज मंजूर करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यात आल्या असून कर्ज वितरणास होणारा विलंब टाळण्याची तरतूद केली आहे. यात लाभार्थ्यांला प्रशासकीय शुल्क भरायची आवश्यकता नाही. छोट्या व्यवसायाकरिता मिळणाऱ्या या कर्जासाठी व्याजदर वार्षिक २ टक्के असून लाभार्थी कर्जाची परतफेड त्रैमासिक हप्त्यात ३ वर्षात धनादेशाद्वारे अथवा रोखीने करु शकतो. लाभार्थ्यांने अर्जासोबत तहसीलदार, नायब तहसीलदार यांचा मुळ उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेचे झेरॉक्स प्रत, निवडणूक ओळखपत्र किंवा आधार कार्डची झेरॉक्स प्रत, पासपोर्ट आकाराचे २ छायाचित्र, वयाच्या पुराव्यासाठी शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र किंवा जन्मतारखेचा दाखला देणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांच्या कुटंूबाच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा १ लक्ष रुपये असणे गरजेचे आहे. विशिष्ट ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांकरीता व्यवसाय स्थळांची भाडेपावती, करारनामा, सातबारा उतारा ही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. कर्जदारास दोन जामीनदार देणेही आवश्यक आहेत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी ओबीसी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे व्यवस्थापकीय संचालकांनी कळविले आहे. छोटे व्यवसाय थाटू इच्छिणाऱ्या युवा वर्गासाठी ही योजना फायदेशिर ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)