शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

तीन तालुक्यांत वाढतोय कोरोनाचा ग्राफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 23:30 IST

जिल्ह्यात बुधवारी (दि. २४ मार्च) ५० बाधितांची नोंद झाली तर ४१ बाधितांनी कोरोनावर मात केली. बुधवारी आढळलेल्या ५० बाधितांमध्ये सर्वाधिक २१ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा १२, गोरेगाव १, आमगाव ८, देवरी २, सडक अर्जुनी २ तसेच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ४ रुग्णांचा समावेश आहे. शहरी भागासह आता ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.

ठळक मुद्दे५० बाधितांची नोंद : ४१ बाधितांनी केली मात : ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहचली ५३९ वर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमगाव, गोंदिया, तिरोडा या तीन तालुक्यांत मागील चार-पाच दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे या तालुक्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून कोरोनाचा ग्राफ वाढत असल्याने या तालुक्यातील नागरिकांना सावध होण्याची गरज आहे. जिल्ह्यात बुधवारी (दि. २४ मार्च) ५० बाधितांची नोंद झाली तर ४१ बाधितांनी कोरोनावर मात केली. बुधवारी आढळलेल्या ५० बाधितांमध्ये सर्वाधिक २१ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा १२, गोरेगाव १, आमगाव ८, देवरी २, सडक अर्जुनी २ तसेच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ४ रुग्णांचा समावेश आहे. शहरी भागासह आता ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी कोरोना संसर्ग नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ९७,३८८ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ८४,५५६ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत ८३,३५४ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ७६,९२१ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १५,२४२ कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी १४,५१६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ५३९ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ५३१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयाेगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. 

१ लाख ८१ हजार चाचण्या कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ८१ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात १५,२४२ कोरोनाबाधित आढळले असून, कोरोनाबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर ८.९ टक्के आहे. मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून, दररोज २२०० चाचण्या केल्या जात आहेत. ६२ हजार नागरिकांना कोरोनाची लस कोरोना लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत एकूण ६१ हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत ५१ केंद्रांवरून लसीकरण केले जात असून, दररोज जवळपास ३,५०० नागरिकांना लसीकरण केले जात आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या