शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सात दिवसात खालावला कोरोनाचा आलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 05:00 IST

बुधवारी (दि.७) ५६ कोरोना बाधितांची नोंद झाली तर ८१ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. गोंदिया येथील एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला. जिल्ह्यात मागील सात महिन्यांपासून कोरोनाच्या भीतीने गोंदियावासीय त्रस्त झाले होते. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७६६३ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ६५२१ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

ठळक मुद्देरुग्ण संख्येत घट : आतापर्यंत ६५२१ बाधितांनी केली कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्कगोदिया : जिल्ह्यात मागील दोन महिन्यात कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने उंचावत असल्याने जिल्ह्यावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्ण वाढीचा चढता आलेख पाहता ऑक्टोबरमध्ये कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता वर्तविली जात होती. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोनाचा आलेख सातत्याने खालावत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.बुधवारी (दि.७) ५६ कोरोना बाधितांची नोंद झाली तर ८१ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. गोंदिया येथील एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला. जिल्ह्यात मागील सात महिन्यांपासून कोरोनाच्या भीतीने गोंदियावासीय त्रस्त झाले होते. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७६६३ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ६५२१ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यात १०३६ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यात बुधवारी आढळलेल्या एकूण ५६ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ४१ कोरोना बाधित हे गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा २, गोरेगाव २, आमगाव ३, सालेकसा २, देवरी २, सडक अर्जुनी तालुक्यातील चार कोरोना बाधितांचा समावेश आहे.कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गोंदिया येथील प्रयोगशाळेत ३१ हजार ८९० स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यामध्ये २४ हजार ८५२ नमुने निगेटिव्ह आले आहे. तर ७६६३ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. २०४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडे प्रलबिंत आहे. तर अनिश्चित नमुन्यांचे प्रमाण कमी झाले आहे.जनजागृती मोहीमेचा फायदाजिल्हा प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी माझे कुटुंब-माझी जवाबदारी माझी जनजागृती ही हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत प्रशासन एकाच दिवशी १० लाख ५० हजार कुटुंबापर्यंत पोहचले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत होत आहे.आकडे कमी झाल्याने आश्चर्यजिल्ह्यात मागील सात दिवसात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. रुग्ण तीन आकडी रुग्ण संख्या ही दोन आकडी झाली आहे. तर कोरोना बाधितांची टेस्ट न करताच त्यांना कोरोनामुक्त घोषीत केले जात आहे. त्यामुळे या सर्व प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या