शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची पाऊले वळली आता ग्रामीण भागाच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 05:00 IST

जिल्ह्यात मंगळवारी (दि. २३) ४८ कोरोना बाधितांची नोंद झाली तर १५ बाधितांनी कोरोनावर मात केली. मंगळवारी आढळलेल्या ४८ बाधितांमध्ये सर्वाधिक २० रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा २, आमगाव ४, सालेकसा ४, देवरी २, सडक अर्जुनी २, अर्जुनी मोरगाव १२ आणि इतर राज्यातील २ रुग्णांचा समावेश आहे. गोंदिया, अर्जुनी मोरगाव, आमगाव आणि तिरोडा तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढ होत आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक रुग्ण गोंदिया तालुक्यात : ४८ बाधितांची नोंद : १५ बाधितांनी केली मात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा हळूहळू वाढू लागला असून आता ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाने आपली पावले शहरासह ग्रामीण भागाकडे वळविल्याचे चित्र आहे. मात्र ग्रामीण भागात कोराेनाचा संसर्ग वाढणे जिल्हावासीयांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे जिल्हावासीयांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून कोरोनाला जिल्ह्यात हद्दपार करण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. जिल्ह्यात मंगळवारी (दि. २३) ४८ कोरोना बाधितांची नोंद झाली तर १५ बाधितांनी कोरोनावर मात केली. मंगळवारी आढळलेल्या ४८ बाधितांमध्ये सर्वाधिक २० रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा २, आमगाव ४, सालेकसा ४, देवरी २, सडक अर्जुनी २, अर्जुनी मोरगाव १२ आणि इतर राज्यातील २ रुग्णांचा समावेश आहे. गोंदिया, अर्जुनी मोरगाव, आमगाव आणि तिरोडा तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे या तालुकावासीयांना वेळीच सावध होण्याची गरज आहे. अन्यथा कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ९६,२६६ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ८३,८८१ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत ८२,२२६ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ७५,८०३ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५,१९२ कोरोना बाधित आढळले त्यापैकी १४,४७५ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ५३० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ११५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. 

रुग्ण बरे होण्याचा दर ९५.६७ टक्के जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच १५ दिवसांच्या कालावधीत कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५३० वर पोहोचली आहे. मात्र जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९५.६७ टक्के असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. तर मृत्यू दर १.२० टक्के आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे होतेय दुर्लक्ष कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणाऱ्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पुन्हा कोरोनाचा उद्रेक होत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घेणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या