शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ककोडी आश्रमशाळेत कोरोनाची एंट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 05:00 IST

ककोडी येथून सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपासून छत्तीसगडमधून १० ते १२ ट्राॅव्हल्स रायपूर, चंद्रपूर, गोंदिया, वडसा, देवरी, राजनांदगाव येथील प्रवासी फेऱ्या मारतात. या गाड्या नागरिकांच्या सोयीच्या असल्या तरी बस चालक, वाहक मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करता सर्रास सर्व नियम धाब्यावर बसवीत आहेत. ककोडी बस स्टँड व गावातून या बसेसचा प्रवास असतो. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचा आरोप केला जात आहे. 

ठळक मुद्दे१४ विद्यार्थिनी निघाल्या बाधित : छत्तीसगडमधून येणाऱ्या बसेसमुळे संसर्गाचा धाेका

लोकमत न्यूज नेटवर्कककोडी :  देवरी तालुुक्यातील ककोडी आश्रमशाळेतील १४ विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाल्याची बाब रविवारी (दि. २१) त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर झाली आहे. यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निमार्ण झाले आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून आश्रमशाळेचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. शासकीय आश्रमशाळा ककोडी येथे १४ विद्यार्थी, वडेकसा १, मुरमाडी ७, तुमळीकसा १ या गावांत असे एकूण २२ कोरोनाबाधित रुग्ण एकाच दिवशी सापडल्याने गावकऱ्यांमध्ये सुद्धा खळबळ उडाली आहे. ककोडीला लागून असलेल्या राजनांदगाव (छत्तीसगड) जिल्ह्यात १३ दिवसांत २४३ कोरोना रुग्ण सापडल्याची माहिती आहे. गडचिरोली जिल्ह्याची सीमासुद्धा या गावाला लागून आहे. परिणामी या जिल्ह्यातील या भागात नेहमीच ये-जा सुरू असते, तर परिसरातील नागरिक कामानिमित्त छत्तीसगडमधल्या गावात ये-जा करतात. मंगळवारी असलेल्या आठवडी बाजारात छत्तीसगड व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचे दुकानदार ककोडीला येतात. मात्र, त्यांच्याकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात नसल्याने परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे बोलले जाते. 

छत्तीसगडमधून येणाऱ्या बसेसमुळे संसर्गात वाढककोडी येथून सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपासून छत्तीसगडमधून १० ते १२ ट्राॅव्हल्स रायपूर, चंद्रपूर, गोंदिया, वडसा, देवरी, राजनांदगाव येथील प्रवासी फेऱ्या मारतात. या गाड्या नागरिकांच्या सोयीच्या असल्या तरी बस चालक, वाहक मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करता सर्रास सर्व नियम धाब्यावर बसवीत आहेत. ककोडी बस स्टँड व गावातून या बसेसचा प्रवास असतो. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचा आरोप केला जात आहे. काेरोना नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष ककोडी येथे जिल्हा परिषद हायस्कुल, शाळा, कॉलेज, अंगणवाडी केंद्र आहे. तेथून विद्यार्थी, नागरिकांची वर्दळ सुरू असते. ककोडी गावात व शेजारच्या गावांत लग्न समारंभ, आठवडी बाजारात गर्दी होत असून, कोरोना नियम पाळण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या