शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना आटोक्यात, इतर आजारांची वाढली साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 05:00 IST

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी (दि.४) ९७७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ९२१ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ६५ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली आहे. यात १ नमुना कोरोनाबाधित आढळला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.१ टक्के आहे. वातावरणातील बदलामुळे सध्या सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तर रुग्णांमध्ये बालकांचा समावेश आहे. त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला आहे. मात्र वातावरणातील बदलामुळे मलेरिया, डेंग्यूसह इतर आजारांची साथ सुरू झाली आहे. त्यामुळे रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढत असून, नागरिकांना काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्य विभागानेसुध्दा साथ रोगांच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी (दि.४) ९७७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ९२१ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ६५ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली आहे. यात १ नमुना कोरोनाबाधित आढळला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.१ टक्के आहे. वातावरणातील बदलामुळे सध्या सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तर रुग्णांमध्ये बालकांचा समावेश आहे. त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ४,३७,२१८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात २,१९,४२५ नमुन्यांची आरटीपीसीआर. तर २,१७,७९३ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४१,१९३ नमुने बाधित आढळले. यापैकी ४०,४८० बाधितांनी कोरोनावर मात केली. सद्य:स्थितीत ११ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 

जिल्ह्यात ४९ टक्के लसीकरण पूर्ण कोरोनाविरुध्दच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ४८०२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात ४,७६,३९५ नागरिकांना पहिला डोस तर १,२८,४०७ नागरिकांना पहिला व दुसरा डोस देण्यात आला. जिल्ह्यातील एकूण १२ लाख ६५ हजार नागरिकांचे लसीकरण करायचे आहे. निर्बंध झाले शिथिल, पण काळजी घ्यामंगळवारपासून (दि.३) जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने लागू केेलेले निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारपासून सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत सुरु होती. निर्बंध शिथिल झाल्यानंतर पहिल्याच दिवशी रस्त्यांवर फारशी गर्दी दिसून आली आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस