वर्षावरील वयोवृद्ध नागरिक तसेच ४५ ते ५९ वयोगटातील जोखीम असणाऱ्या नागरिकांना लस देण्यात येत आहे अशी माहिती सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. युगा नाकाडे यांनी दिली आहे.
कोरोना लसीकरण यशस्वी करण्यासाठी सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. नाकाडे यांच्यासह आरोग्य सेवक प्रमोद भिमटे, परिचारिका माया नागपुरे, दुर्गा मांढरे, कल्याणी बोरकर, आशा कार्यकर्ता प्रदीपा बडोले, शुभांगी बोळणकर, मदतनीस आशा ईस्कापे सहकार्य करीत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र पवनीधाबे अंतर्गत गावातील ज्येष्ठ नागरिकांची तसेच परिसरातील ग्रामवासीयांची नियमित कोरोना आरटीपीसीआर व रॅट तपासणी केली जाते. परिसरातील नागरिकांचा तपासणी व लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण मेंढे यांनी सांगीतले.
पहिल्याच दिवशी मुंगली येथे १०० नागरिकांना लस देण्यात आली. लसीकरणासाठी डॉ. मेंढे, आरोग्य सहायिका सविता आंबेडारे, आरोग्य सेविका दिपमाला उंदिरवाडे, शुभांगी मोहनकर,आरोग्यसेवक यशवंत उंदिरवाडे, विजय जांभुळकर, आशा कार्यकर्ता शोभा राऊत, मदतनीस सरिता साखरे, वाहक शंकर फुलसुंगे यांनी सेवा दिली.