बोंडगावदेवी : प्राथमिक आरोग्य केंद्र चान्नाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी परिसरातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या आरोग्य सेवेचा लाभ सुलभरीत्या मिळावा म्हणून विविध उपक्रम राबवित आहेत. मानव विकास कार्यक्रमांतर्गत गरोदर महिला तसेच बालकांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाक्टीच्या वतीने मानव विकास कार्यक्रमांतर्गत वेळोवेळी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. कार्यक्षेत्रातील गरोदर महिला तसेच बालक यांचे आरोग्य सुदृढ राहावे. त्यांची नियमित काळजी घेऊन वेळोवेळी त्यांच्या तपासण्या करून औषधोपचार करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात येते. शिबिराप्रसंगी गरोदर महिलांची तपासणी करून त्यांना आवश्यक सल्ला देण्यात आला. बालकांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. यावेळी परिसरातील ८० गरोदर महिलांना कोविड लसीकरण करण्यात आले. भूमाली उईके, जगनाडे, मंदा भोयर, शेंडे, आरोग्य सेवक यांनी सहकार्य केले.