शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I : कटकच्या मैदानात हार्दिक पांड्याची कडक खेळी; सिक्सरच्या 'सेंच्युरी'सह साजरी केली 'फिफ्टी'
2
“संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक
3
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
4
हात फॅक्चर असताना ते मैदानात उतरले अन्...! शतकाच्या बादशहानं शेअर केली दिग्गजासोबतच्या शतकाची गोष्ट
5
स्मृती मानधनाच नव्हे, तर 'या' खास ९ लोकांनीही पलाश मुच्छालला केलं 'अनफॉलो', पाहा यादी
6
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
7
अनंत अंबानी यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान! मिळाला प्रतिष्ठेचा 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन' पुरस्कार
8
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
9
Numerology: त्रिग्रही लक्ष्मी नारायण योग, ६ मूलांकांना दुपटीने लाभ; पद-पैसा-नफा, चांगला काळ!
10
राज्यात थंडीचा कडाका वाढला! अहिल्यानगरमध्ये ७. ४ सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद
11
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
12
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
13
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
14
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
15
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
16
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
17
प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न
18
हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित
19
Jara Hatke: फुटक्या कवडीची खरी किंमत माहितीय? प्राचीन चलनव्यवस्थेशी आहे थेट संबंध 
20
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया तालुक्याचे कोरोना मीटर सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:33 IST

गोंदिया : मागील आठ दहा दिवसांपासून गोंदिया तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे या तालुक्यातील कोरोनाचे मीटर ...

गोंदिया : मागील आठ दहा दिवसांपासून गोंदिया तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे या तालुक्यातील कोरोनाचे मीटर सातत्याने सुरुच असून आतापर्यंतच्या एकूण बाधितांचा आकडा ८३२० वर गेला आहे. तर सद्यस्थितीत १०४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे गोंदिया शहर आणि तालुकावासीयांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

जिल्ह्यात रविवारी ११ बाधितांची नोंद झाली तर दोन बाधितांनी कोरोनावर मात केली. रविवारी आढळेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक १० कोरोनाबाधित रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तर गोरेगाव तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात इतर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात असली तर गोंदिया तालुक्यात बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ७०५४९ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ५८७७९ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्याठी रॅपिड अँटीजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत ६८६०३ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ६२३९८ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४४३३ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १४११८ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत १३० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून १५ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.

............

आतापर्यंत १ लाख ४० हजार चाचण्या

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने १ लाख ४० हजार चाचण्या करण्यात आल्या आहे. यात १४४३३ कोरोना बाधित आढळले असून १४११८ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांचा दर १२.९ असून मृत्यू दर १.२० टक्के आहे.

........

संसर्ग टाळण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करा

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरच नियमित वापर करावा. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि दिवसभरात वारंवार हातपाय स्वच्छ पाण्याने धुवावे, आदी गोष्टींचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.

..........