शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आमगावच्या झेडपी हायस्कूलमध्ये कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 23:30 IST

इयत्ता पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळा मागील पाच दिवसांपासून बंद करण्यात आल्या आहे. मात्र दहावी आणि बारावीचे विशेष वर्ग सुरू आहेत. आमगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ विद्यालय असून सध्या दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी याच शाळेतील एका बारावीच्या विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली होती. दरम्यान त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला.

ठळक मुद्दे१६ विद्यार्थी बाधित : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश, पालकांच्या काळजीत पडली

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव:  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आता शाळा आणि विद्यालयांमध्येसुध्दा कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. आमगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल व विद्यालयाचे तब्बल १६ विद्यार्थी कोरोना बाधित आढळल्याची बाब बुधवारी (दि.२४) अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढे आली आहे. इयत्ता पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळा मागील पाच दिवसांपासून बंद करण्यात आल्या आहे. मात्र दहावी आणि बारावीचे विशेष वर्ग सुरू आहेत. आमगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ विद्यालय असून सध्या दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी याच शाळेतील एका बारावीच्या विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली होती. दरम्यान त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे मुख्याध्यापकांनी याची माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर बुधवारी शाळेतील दहावी आणि बारावीच्या चाळीस विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला. त्यात दहावीचे १४ तर बारावीचे दोन विद्यार्थी कोरोना बाधित आढळले. यामुळे शाळेत खळबळ उडाली असून आता विद्यालयातील एकूण १४० विद्यार्थी आणि शिक्षकांची सुध्दा कोरोना चाचणी केली जाणार आहे. १६ विद्यार्थी कोरोना बाधित आढळल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी शाळा आणि कनिष्ठ विद्यालयात बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच विद्यालयाचे पूर्णपणे सॅनिटायझेशन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्याची माहिती आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर असून याच दरम्यान विद्यार्थी कोरोना बाधित आढळल्याने समस्या निर्माण झाली आहे. 

विद्यार्थ्यांने माहिती न दिल्याने वाढला संसर्ग जि.प.हायस्कूल व कनिष्ठ विद्यालयातील एक विद्यार्थी कोरोना बाधित आला. मात्र त्यांनी याची माहिती शिक्षकांना दिली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्याच्या संपर्कात अनेक विद्यार्थी आले. यातून शाळेत कोरोनाचा संसर्ग वाढल्याची माहिती शिक्षकांनी दिली. कोरोनाची माहिती लपवू नकाजिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशात कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याची माहिती आरोग्य विभागाला वेळीच द्या. यामुळे वेळीच उपाययोजना करणे शक्य होवून संसर्ग रोखण्यास मदत होईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे यांनी कळविले आहे.

 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या