शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कोरोनामुळे विकासाची घडी विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:18 IST

पिकाच्या संरक्षणासाठी झटका मशीन वरदान नवेगावबांध : ज्या शेतकऱ्यांच्या पिकांची वन्यप्राण्यांपासून नासाडी होत आहे, अशा शेतकऱ्यांना ...

पिकाच्या संरक्षणासाठी झटका मशीन वरदान

नवेगावबांध : ज्या शेतकऱ्यांच्या पिकांची वन्यप्राण्यांपासून नासाडी होत आहे, अशा शेतकऱ्यांना झटका मशीन म्हणजे एक वरदानच आहे. तरी शेतकऱ्यांनी या झटका मशीनचा वापर पिकांच्या संरक्षणासाठी करावा, असे प्रतिपादन माती परीक्षण केंद्राचे जिल्हा नियंत्रण अधिकारी आर. एम. रामटेके यांनी केले आहे.

वातावरणातील बदलामुळे भीती

गोंदिया : कोरोना विषाणू महामारीचे संकट डोक्यावर घोंघावत असतानाच अचानक होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखीसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. यामुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण होऊन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ओपीडीमध्ये रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून येत आहे.

रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा

गोंदिया : शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात उखडलेले असून त्यांवर खड्डे पडलेले आहे. पावसाळ्यात त्यामुळे नागरिकांना रहदारीला फारच त्रास होतो. अशात मात्र रस्त्यांच्या या दुर्गतीमुळे अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. खड्ड्यांमुळे कित्येकदा अपघात घडले आहेत. शहरातील बहुतांश रस्त्यांची अशी गत झाली असून शहरवासी चांगलेच त्रासले आहेत. याकडे लक्ष देत नगर परिषदेने शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी शहरवासीयांकडून जोर धरत आहे.

बाजारातील रस्ते मोकळे करा

गोंदिया : बाजारपेठेतील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यातही दुकानदार त्यांच्या दुकानातील सामान व बोर्ड्स रस्त्यावर आणून ठेवतात. परिणामी नागरिकांना रस्त्याने ये-जा करण्यासाठी रस्ते आणखीच अरुंद होतात. अशात त्यांची वाहनेही रस्त्यावरच उभी केली जात असल्याने अन्य नागरिकांना ये-जा करताना अडचण होते. हा प्रकार लक्षात घेत वाहतूक नियंत्रण शाखा तसेच नगर परिषदेने कठोर पाऊल उचलत बाजारातील रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्याची मागणी आहे.

कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी

सडक-अर्जुनी : मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ६ वर कोहमारा गाव आहे. मात्र, कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची कुठलीही सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. येथे प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत थांबावे लागते. येथे प्रवासी निवारा देण्याची मागणी केली जात आहे.

कामगारांची योजना पूर्ववत सुरू करा

गोंदिया : इमारत बांधकाम करणाऱ्या गरीब मजुरांना थेट पाच हजार रुपये देण्याची योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी खराशी व परिसरातील बांधकाम कामगारांनी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या कालावधीत इमारत व इतर बांधकामे बंद झाली होती.

तक्रार निवारणाकडे ‘बीएसएनएल’चे दुर्लक्ष

गोंदिया : दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. इंटरनेट व मोबाईल फोन ही प्रत्येकाची गरज बनली आहे. ‘बीएसएनएल’मार्फत इंटरनेट ब्रॉडबँड सेवा पुरविली जात आहे. मात्र, या सेवा ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत; मात्र तरीही ग्राहकांच्या तक्रारींकडे बीएसएनएलचे दुर्लक्ष आहे.

स्वत:च्या घरकुलाचे स्वप्न होणार साकार

सडक-अर्जुनी : ‘सर्वांसाठी घरे-२०२०’ हे केंद्र शासनाचे महत्त्वाचे धोरण असून राज्य शासनानेही या धोरणाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे आता नागरिकांचे स्वत:च्या घरकुलाचे स्वप्न साकार होत असल्याचे दिसत आहे.

प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला

सडक-अर्जुनी : शहरासह जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, सगळीकडे प्लास्टिकचा कचरा दिसत असून, शासनाच्या आदेशाला तिलांजली मिळत आहे. प्रदूषणात होणारी वाढ थांबविण्यासाठी प्लास्टिक पिशव्या बंद करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला.

बाजारात विद्युत व्यवस्थेची मागणी

सडक-अर्जुनी : येथील गावात आठवडी बाजार भरतो. गावात या रस्त्यावर रहदारी अधिकच असल्याने विद्युतपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करावा लागतो. हा रस्ता सौंदड, पिपरी, कोहमारा या रस्त्याला मार्गक्रम आहे.

गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाविना

सडक-अर्जुनी : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्त्यांचे बांधकाम केले जाते. मात्र, अनेक गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. गतवर्षी पावसाने रस्त्यांची वाट लावली होती. याकडे लक्ष देणे गरजेेचे झाले आहे.

हॉर्नमुळे शहरातील नागरिक त्रस्त

सडक-अर्जुनी : शहराच्या आतील भागातून मोठ्या प्रमाणात जड वाहनांचे आवागमन होत असून त्यांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे नागरिकांना त्रास होत आहे. ही वाहने भरधाव धावत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.

रिफ्लेक्टरअभावी अपघातांत वाढ

सडक-अर्जुनी : वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने होत असलेल्या अपघाताची संख्या लक्षणीय आहे. एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात हे केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याचे निदर्शनास येते. हे अपघात टाळता येणे शक्य असताना वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याकडेही दुर्लक्ष होत आहे. महामार्गावर अनेक वाहने विनारिफ्लेक्टर धावतात.

मोकाट जनावरांमुळे वाहतूक ठप्प

सडक-अर्जुनी : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नगर परिषदेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त केल्यास वाहतुकीची समस्या सुटणार असून नागरिकांचा त्रास टळेल. अनेक दिवसांपासून शहरात मोकाट जनावरांची समस्या कायम असतानाही कारवाई होत नाही.