शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
4
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
5
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
6
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
7
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
8
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
9
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
10
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
11
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
12
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
13
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
14
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
15
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
16
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
17
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
18
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
19
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
20
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर

कोरोना 10,000 पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2020 5:00 AM

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोना बाधितांची संख्या तीन आकड्यात वाढत होती. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा या दोनच महिन्यात ७५०० वर पोहचला. मात्र ऑक्टोबर महिन्यात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला . तब्बल नऊ महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात १० हजार ७७ कोरोना बाधितांची नोंद झाली. पण मागील दोन तीन दिवसांपासून कोरोना बाधितांचा आलेख पुन्हा उंचावत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्दे११६ नवीन कोरोना बाधितांची भर : एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू

n  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मार्च महिन्यात काेरोनाचा शिरकाव झाला. सुरूवातीला केवळ एक रुग्ण आढळला होता. त्यानंतर दीड महिने जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र मे महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा आलेख वाढण्यास सुरूवात झाली. मार्च ते नोव्हेंबर या कालावधीत तब्बल १००७७ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. कोरोना बाधितांचा आकडा बुधवारी (दि.४) १० हजारांच्या पार झाला. तर ११६ नवीन कोरोना बाधितांची त्यात पुन्हा भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही अशी चिंता जिल्हावासीयांना सतावून लागली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोना बाधितांची संख्या तीन आकड्यात वाढत होती. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा या दोनच महिन्यात ७५०० वर पोहचला. मात्र ऑक्टोबर महिन्यात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला . तब्बल नऊ महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात १० हजार ७७ कोरोना बाधितांची नोंद झाली. पण मागील दोन तीन दिवसांपासून कोरोना बाधितांचा आलेख पुन्हा उंचावत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात बुधवारी ११६ नवीन कोरोना बाधित आढळले तर ३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर गोंदिया येथील ६८ वर्षीय रुग्णांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बुधवारी आढळलेल्या ११६ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ६२ कोरोना बाधित हे गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा १४, आमगाव १३, सालेकसा ४, देवरी ३, सडक अर्जुनी ७, अर्जुनी मोरगाव १० आणि बाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ३९३३६ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी २९९५५ नमुने निगेटिव्ह आले. ६८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरीत शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. यातर्गंत ३९०९३ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ३५१८७ नमुने कोरोना निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १००७७ कोरोना बाधित आढळले असून यापैक ९१८७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या स्थितीत ७५९ कोरोना ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. 

रुग्ण बरे होण्याचा दर ९०.११ टक्केजिल्ह्यात कोरोना बाधितांचा आलेख उंचावत असला तरी कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सुध्दा अधिक आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.११ टक्के आहे. तर रुग्ण वाढीचा डब्लिंग रेट १११ दिवस आहे. तर मृत्यू दर १.१७ टक्के आहे. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या