शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
3
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
4
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
5
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
6
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदिपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
7
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
8
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
9
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
10
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
11
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
12
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
13
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
14
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
15
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
16
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
17
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
18
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
19
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
20
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."

दोषी वनरक्षक व वनमजूर निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 05:00 IST

तालुक्याची घनदाट जंगलासाठी ओळख आहे. त्यात शेंडा, जांभळी-दोडके, कोसमतोंडी, सौंदड, कोहमारा, रेंगेपार-पांढरी, मालीझुंगा व डव्वा परिसरात आजही मौल्यवान सागवान वृक्ष मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात. याच परिसरात लाकूड ठेकेदारांच्या माध्यमातून सागवान तस्करी तसेच काही वन कर्मचाऱ्यांच्या संगनमताने वनांची कत्तल होत असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क सडक-अर्जुनी : वनपरिक्षेत्र कार्यालयअंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव-डेपोसह वनक्षेत्रातील सतीटोला गावाजवळील कंपार्टमेंट क्रमांक-६६२ मध्ये गेल्या १५ दिवसांपूर्वी ६ सागवान झाडांची अवैध तस्करी करण्यात आल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणात चौकशीअंती वनरक्षक व वनमजुरास अवैध वृक्षतोडप्रकरणी ३१ मार्च रोजी निलंबित करण्यात आले आहे.तालुक्याची घनदाट जंगलासाठी ओळख आहे. त्यात शेंडा, जांभळी-दोडके, कोसमतोंडी, सौंदड, कोहमारा, रेंगेपार-पांढरी, मालीझुंगा व डव्वा परिसरात आजही मौल्यवान सागवान वृक्ष मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात. याच परिसरात लाकूड ठेकेदारांच्या माध्यमातून सागवान तस्करी तसेच काही वन कर्मचाऱ्यांच्या संगनमताने वनांची कत्तल होत असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. वनखात्याच्या माध्यमातून जंगलांचे रक्षण करण्यासाठी वन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून शासन कोट्यवधी रुपये खर्च करते, पण तालुक्यात वनरक्षकच भक्षक निघाल्याचे चित्र पाहावयास मिळत ­आहे.त्यातच सतीटोला गावाजवळील जंगलातील कंपार्टमेंट क्रमांक- ६६२ मध्ये ६ सागवान वृक्षांची कत्तल करण्यात आली. त्या ६ सागवान झाडांच्या थुटांची किंमत ९५ हजार रूपये असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच गोंदियाचे सहायक वनसंरक्षक अधिकारी प्रदीप पाटील (रोहयो, वन्यजीव) यांच्या मार्गदर्शनात येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मडावी, वनक्षेत्र अधिकारी गजानन सयाम यांच्या चौकशीत ४ आरोपींसह २ वन कर्मचारी दोषी आढळले आहेत. यामुळे उपवनसंरक्षक कुलराज सिंग यांनी वन कायद्यानुसार कारवाई करून वनरक्षक सोडगीर व वनमजूर लोखंडे यांना ३१ मार्च रोजी निलंबित केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. निलंबन काळात त्या दोघांना नवेगावबांध येथील वनपरिक्षेत्र  कार्यालयात जोडण्यात आले आहे.

सडक-अर्जुनी तालुक्यात अवैध वृक्षतोडप्रकरणी वन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अशा अवैध वृक्षतोडीच्या घटना होऊ नयेत, यासाठी कर्मचाऱ्यांनी सजग राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी क्षेत्र सहायकांनीसुद्धा आपले कर्तव्य पार पाडताना अशा घटना घडू नये, यासाठी लक्ष देण्याची गरज आहे.-सुनील मडावी, वनपरिक्षेत्र अधिकारी, सडक-अर्जुनी

 

टॅग्स :forest departmentवनविभाग