शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंशदायी पेंशनच्या पावत्या दोन महिन्यांत देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 20:02 IST

नागपूर विभागातील प्राथमिक शिक्षकांना अंशदायी पेंशनच्या पावत्या दोन महिन्यांत देवून विविध प्रलंबित मागण्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी दिले.

ठळक मुद्देशिक्षण उपसंचालकांचे आश्वासन : प्राथमिक शिक्षकांच्या मागण्या सोडविणार

आॅनलाईन लोकमतगोंदिया : नागपूर विभागातील प्राथमिक शिक्षकांना अंशदायी पेंशनच्या पावत्या दोन महिन्यांत देवून विविध प्रलंबित मागण्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी दिले.धंतोली येथील बालभारती भवनातील नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात सहविचार सभा पार पाडली. या वेळी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघासोबत (दि.२२) झालेल्या सहविचार सभेत ते बोलत होते.शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांच्या अध्यक्षतेत विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे मार्गदर्शक तथा शिक्षण मंडळाचे माजी सदस्य व शिक्षक नेते मिलिंद वानखेडे, जिल्हा संघटक राजेंद्र खंडाईत, जिल्हा संघटन सचिव खिमेश बढिये, गोंदिया जिल्हा संघटक बाळकृष्ण बालपांडे यांच्या उपस्थितीत सहविचार सभा पार पडली.यात औरंगाबाद व मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीसीपीएसची दुहेरी कपात थांबविण्यात यावी, कपात करण्यात आलेल्या डीसीपीएस रकमेसंदर्भात हिशोबाच्या पावत्या मार्च महिन्याअखेर देण्यात याव्यात, मे २०१२ नंतर शिक्षण सेवेत नियुक्त कर्मचाऱ्यांना हिशोबाच्या पावत्या मार्च महिन्याअखेर देण्यात याव्यात, मे २०१२ नंतर शिक्षण सेवेत नियुक्त कर्मचाºयांना संरक्षण देण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या.तसेच १२ वर्षे व १४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी लागू करावी, गोंदिया जिल्ह्यातील ६५ प्राथमिक शाळांचे जानेवारीचे थकीत वेतन तातडीने अदा करावे, गोंदिया जिल्ह्यातील शापोआचे जून २०१७ पासून थकीत देयके त्वरित द्यावी, शिक्षण उपसंचालक कार्यालयात थकीत वैद्यकीय देयकांचा तातडीने निपटारा करुन दिलासा द्यावा, यासह इतर अनेक शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यात आली.प्राथमिक शिक्षकांच्या मागण्या न्यायपूर्ण असून संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश देवून तातडीने निपटारा करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षण उपसंचालक पारधी यांनी दिले. सदर बैठकीत विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे नागपूर जिल्हा संघटन प्रमुख राजेंद्र खंडाईत, संघटन सचिव खिमेश बढिये, जिल्हा संघटन प्रमुख बाळकृष्ण बालपांडे, कळमेश्वर तालुका संघटक गणेश उघडे, महिला आघाडी संघटक हर्षकला हनवते, रेशिम कापगते, चंद्रशेखर पंचभाई, अभिषेक अग्रवाल, आत्माराम बावनकुडे, राजू भस्मे, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भोयर, संजय धरममाळी, सतीश शरणागत, राजू हारगुडे, मनिष जुनोनकर, बबन देवळे, मनराज गायकवाड, अशोक खंडाईत, प्रदीप चकोले आदी उपस्थित होते.