शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

समाजहितासाठी योगदान द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 21:14 IST

समाजातील सर्व घटकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे मंथन व्हावे, हा या सप्ताहामागचा उद्देश आहे. डॉ. आंबेडकर हे ज्ञानी व्यक्तिमत्व होते. त्यांनी असंख्य विषयांवर विस्तृत लिखान केले. त्यांची ग्रंथसंपदा विपुल आहे.

ठळक मुद्देअभिमन्यू काळे : सामाजिक समता सप्ताहाचे उदघाटन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : समाजातील सर्व घटकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे मंथन व्हावे, हा या सप्ताहामागचा उद्देश आहे. डॉ. आंबेडकर हे ज्ञानी व्यक्तिमत्व होते. त्यांनी असंख्य विषयांवर विस्तृत लिखान केले. त्यांची ग्रंथसंपदा विपुल आहे. डॉ. आंबेडकरांनी समाजाच्या कल्याणासाठी आपले संपुर्ण आयुष्य वेचले. त्यांची प्रेरणा घेवून प्रत्येकाने समाजाच्या कल्याणासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीचे औचित्य साधून ८ ते १४ एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. ८ एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवनातील सभागृहात या सप्ताहाचे उदघाटक म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे बोलत होते.अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे होते. प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता बेदरकर, समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार, प्रा.धर्मशील चव्हाण, बार्टीचे सहायक प्रकल्प संचालक (समतादूत) रिदय गोडबोले यांची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरू मानले. महात्मा फुलेंनी ‘शेतकऱ्यांचे आसूड’ ग्रंथामधून शेतकºयांचे दु:ख मांडले. यातून त्यांनी विचारांना कृतीची जोड दिली. समाजाच्या हिताचा विचार करु न त्यांनी पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर व्यक्तींनी आपल्या विचारांना कृतीची जोड दिल्यामुळे ही माणसे महामानव झालीत. शिक्षण घेवून डॉ.आंबेडकरांनी सर्वप्रथम समाजाच्या कल्याणाचा विचार केला. ‘प्रॉब्लेम आॅफ रूपी’ या ग्रंथातून त्यांनी आर्थिक विचार मांडले. हे विचार अत्यंत महत्वाचे आहेत. कितीही वाईट परिस्थिती आली तरी समाजाच्या हितासाठी मागे राहणार नाही, हे डॉ. आंबेडकरांनी ठरविल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. सविता बेदरकर म्हणाल्या, सामाजिक समतेची पायाभरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली. ‘जाती तोडो समाज जोडो’ ही संकल्पना त्यांनी मांडली. धर्मनिरपेक्ष असलेल्या आपल्या देशात धर्म कधकधी डोके वर काढत असल्याचे सांगून डॉ. बेदरकर म्हणाल्या, सर्व मानव हे एक झाले पाहिजे असे डॉ. आंबेडकरांना वाटायचे. या सप्ताहामुळे समाजात समता निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.सन २०१७-१८ या वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार मिळाल्याबद्दल सुर्तीसेन वैद्य, लिखन निर्विकार, चरणदास चंद्रिकापुरे, उमाकांत अवस्थी, होमराज ठाकरे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. या वेळी प्रा. धर्मशील चव्हाण यांनी दुसºया सत्रात स्पर्धा परीक्षेबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, समाज कल्याण विभागाच्या वसतिगृह व निवासी शाळेचे विद्यार्थी, बार्टीचे समतादूत, समाज कल्याण विभाग, विविध महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी केले. संचालन शिक्षक प्रदीप ढवळे यांनी केले. आभार समतादूत शारदा कळसकर यांनी मानले.