शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी समाजावर सातत्याने अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 21:19 IST

अर्जुनी-मोरगाव परिसरातून वनआंदोलन सुरू करण्यात आले. हे केवळ वनआंदोलन नसून जीवनाचे आंदोलन होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या आंदोलनाची व शोषित, पीडित, आदिवासी समाजाची कधीच दखल घेतली नाही.

ठळक मुद्देनाना पटोले : हलबा-हलबी सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : अर्जुनी-मोरगाव परिसरातून वनआंदोलन सुरू करण्यात आले. हे केवळ वनआंदोलन नसून जीवनाचे आंदोलन होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या आंदोलनाची व शोषित, पीडित, आदिवासी समाजाची कधीच दखल घेतली नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत हा समाज अन्यायच सहन करीत आहे. लढा लढतच आहे. पण शासनाकडून नेहमीच दुर्लक्ष केले जाते, असे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले.कुंभिटोला-बाराभाटी येथे हलबा-हलबी सामूहिक विवाह सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या सामुहिक विवाह सोहळ््याचे उद्घाटन पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने अमरावतीचे इंजि. बी.टी. राऊत, सेवानिवृत्त पोलीस आयुक्त बी.के. गावराने, माजी आ. रामरतन राऊत, मीना राऊत, डॉ. नामदेव किरसान, श्रावण राणा, डॉ. देवकुमार राऊत, गिरीश पालीवाल, तहसीलदार सी.आर. भंडारी, राजेश नंदागवळी, शेषराव कोरेटी, मनोहर चंद्रिकापुरे, अजय कोठेवार, किशन मानकर, वाय.सी. भोयर, प्रशांत भस्मे, लक्ष्मीकांत धानगाये, किशोर तरोणे, सुरेखा नाईक, पद्मा राठोड, महेंद्र जुगणाके, रत्नदीप दहिवले, अनिल दहिवले, करूणा नांदगावे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना पटोले यांनी, शासनाने योजना काढल्या, पण रितसर राबविल्या नाही. सामाजिक न्याय व सलोखा राखण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत नमूद केले. पण तो अधिकार, तो न्याय कधीच आदीवासी समाजाला मिळत नाही. हीच परिस्थिती देशासह राज्यात आहे. अनेक विभागात भ्रष्टाचार सुरू आहेत, पण शासनाचे लक्ष नाही, असे सांगीतले.तसेच या वेळी ना. राजकुमार बडोले, चंद्रिकापुरे, दहिवले, श्रावण राणा, राजेश नंदागवळी, गिरीश पालीवाल, रामरतन राऊत, डॉ. नामदेव किरसान, सहेषराम कोरेटी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.प्रास्ताविक तानेश ताराम यांनी मांडले. संचालन करून आभार मोहन औरासे यांनी मानले. कार्यक्रमासाठी तुलाराम मारगाये, श्यामलाल चर्जे, नरहरी ताराम, रामू औरासे, वासुदेव औरासे, लिलाधर ताराम, हरिभाऊ नाईक, बब्बू भंडारी, मोहन नाईक, प्रधान यांच्यासह समाजबांधवांनी सहकार्य केले.सामूहिक विवाह सोहळ्याचे २० वे वर्षसदर सामूहिक विवाह सोहळ्याचे हे २० वर्ष आहे. कुंभिटोला-बाराभाटी येथील हलबा-हलबी समाज संघटनेच्या शाखेने सदर सोहळ्याचे आयोजन करून २० वर्षांपासूनची ही परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे यात विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, वैवाहिक सोयीसुविधांचा लाभ द्यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.२७ जोडपी परिणयबद्धसुरूवातीला आदिवासींच्या दैवतांचे पूजन व दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. वर-वधूंचा परिचय करून देण्यात आला. काही चिमुकल्यांनी गोंडी नृत्य सादर केले. संगीत रजनी कार्यक्रम घेण्यात आला. अशा मनोरम वातावरणात २७ जोडपी परिणयबद्ध झाली. त्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देण्यात आले.