शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कार्यमुक्त कंत्राटी एएनएमचे साखळी उपोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 20:41 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चार ते पाच वर्षे सेवा केल्यानंतर तीन वर्षांपूर्वी अतिरिक्तच्या नावे ४० पेक्षा अधिक एएनएमला कार्यमुक्त करण्यात आले होते.

ठळक मुद्देमागण्या मार्गी लावा : विविध संघटनांचा पाठिंबा

आॅनलाईन लोकमतगोंदिया : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चार ते पाच वर्षे सेवा केल्यानंतर तीन वर्षांपूर्वी अतिरिक्तच्या नावे ४० पेक्षा अधिक एएनएमला कार्यमुक्त करण्यात आले होते. दरम्यान रिक्त जागांनुसार त्यांचे समायोजन करण्यात येईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले होत; मात्र आता तीन वर्षांचा काळ लोटूनही आरोग्य विभागाने त्या कंत्राटी एएनएम यांना कामावर घेतले नाही.या अन्यायाविरूद्ध कंत्राटी बेरोजगार एएनएम अनेकदा जिल्हा परिषदेत पायपीट केली. मात्र यश न आल्याने त्यांनी सोमवारपासून (दि.४) जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.त्यांच्या उपोषणाला कास्ट्राईब कर्मचारी संघटना व शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे. आता तरी जिल्हा परिषद प्रशासन न्याय देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील तीन वर्षांपासून कामावर रूजू होण्याच्या प्रतीक्षेत ४० हून अधिक बेरोजगार कंत्राटी एएनएम सातत्याने जिल्हा परिषदेच्या चकरा मारत होत्या. दरम्यान त्यांनी जि.प. चे पदाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. मात्र मागील तीन वर्षांपासून त्यांच्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे कंटाळून त्यांनी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे डॉ. माधवराव कोटांगले, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तथा माजी जि.प. सदस्य संजय टेंभरे यांच्या मार्गदर्शनात जि.प. कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवू, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. उपोषणकर्त्यांमध्ये रंजिता सार्वे, डॉली पालांदूरकर, शीला ठाकरे, शेफाली श्यामकुवर, वर्षा खोब्रागडे, कल्पना बन्सोड, ललिता भोंगाडे, योगेश्वरी सव्वालाखे, माधुरी खेळकर, नीता ढवळे, ममता तितिरमारे, रूपाकुमारी चौधरी, भाग्यश्री झिंगरे, शोभा ठाकरे, प्राची वानखेडे यांचा समावेश आहे.अनेक पदाधिकाऱ्यांची आंदोलनस्थळी भेटसदर कार्यमुक्त एएनएम यांच्या उपोषणस्थळी जिल्ह्यातील अनेक पक्ष व संघटनांचे पदाधिकारी भेट देवून आपला पाठिंबा दर्शवित आहे. गुरूवारी (दि.७) माजी आमदार दिलीप बन्सोड, बहुजन एम्पॉईज संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र खोब्रागडे, डॉ.डी.बी. डहाट, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे डॉ. माधवराव कोटांगले, शेतकरी संघटनेचे संजय टेंभरे आदी मान्यवरांनी सदर उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सदर मान्यवरांच्या उपस्थितीत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रवींद्र ठाकरे यांना निवेदन देऊन चर्चा केली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर कार्यमुक्त कंत्राटी एएनएम यांचे समायोजन करण्यात यावे, अशा आशयाचे पत्र वरिष्ठांना पाठविण्याचे आश्वासन दिले.