शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशाची अनैसर्गिक स्पर्धा सुरू

By admin | Updated: June 28, 2015 01:14 IST

सन २०१५-१६ या वर्षात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांकडे शाळांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.

स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल शहराकडेगोंदिया : सन २०१५-१६ या वर्षात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांकडे शाळांनी लक्ष घालणे आवश्यक आहे. पटसंख्येपेक्षा अधिकचा प्रवेश दिला जातो. त्यामुळे त्या वर्गात बसण्यास विद्यार्थ्यांना जागा राहात नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरातील शाळेत धाव घेत असल्याने शहरात प्रवेश घेण्याची अडचण तर ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची वाणवा अशी समस्या निर्माण झाली आहे.शहरात चांगले शिक्षण मिळते याच धारणेतून ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरातील शाळेत आपल्याला प्रवेश मिळावा यासाठी धाव घेतो. त्यामुळे शहरात प्रवेशाची अनैसर्गीक स्पर्धा सुरू होते. शहरातील शाळाांत निर्माण होत असलेली गर्दी रोखण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना यावर आळा घालण्यासंदर्भात पत्र दिले आहे. शहराकडे प्रवेशासाठी धाव असते मात्र ग्रामीण भागातील तुकड्यांतील प्रवेश क्षमता पुर्ण होत नाही. शहरातील शाळांनी प्रवेश देताना इतर शाळांच्या प्रवेशाचा विचार करूनच प्रवेश द्यावा असे शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्रातून सूचविले आहे. क्षमतेपेक्षा अधिक लोकांना प्रवेश द्यायचे असल्यास त्यासाठी शिक्षण उपसंचालकांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. गोंदिया जिल्ह्यात प्रवेश क्षमतेच्या तुलनेत दोन हजार विद्यार्थी अधिक पास झाले. परंतु त्यांना प्रत्येक शाळेत २० विद्यार्थी प्रमाणे प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे शिक्षकही अतिरिक्त होणार नाही. (तालुका प्रतिनिधी)ग्रामीण भागांतही इंग्रजीचे ‘फॅड’ कुऱ्हाडी : शहराबरोबरच आता ग्रामीण भागांतही इंग्रजी शिक्षणाचे ‘फॅड’ दिसून येत आहे. यामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे दिसून येत आहे. इंग्रजी शिक्षणाने मराठी शाळांवर गाज पाडली आहे. सर्वांनाच आपली मुले फाडफाड इंग्रजी बोलणारी हवी अशी अपेक्षा आहे. त्यामुळेच आपल्या मुलांना इंग्रजी ़शिक्षण झेपणार की नाही याकडे लक्ष न देता साधारण कुटुंबातील पालक वर्ग सुद्धा आपल्या मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेत न शिकविता इंग्रजी शाळेत शिकविण्याची ईच्छा व्यक्त करीत आहे. त्यांचा मार्ग सुकर करण्यासाठी संस्थाचालकांनी गावागावांत कॉन्व्हेंट उघडल्या आहेत. कुऱ्हाडी, कवलेवाडा, चोपा, कालीमाटी, गणखैरा, गिधाडी, मुंडीपार या गावातही कॉन्व्हेंट पोहचल्या असून पालकांना आकर्षित करीत आहेत. परिणामी त्यामुळे गावातील प्राथमिक शाळा ओस पडू लागल्या आहेत. पाच विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक अशी काही शाळांची स्थिती झाली आहे. शासकिय कर्मचारी आपल्या पाल्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवित आहेत. त्यामुळे हायस्कुलच्या विद्यार्थी संस्खेतही घट झाली असून काही तुकड्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशात जिल्हा परिषद व अनुदानित शाळांमध्ये शिकविण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता व कॉन्व्हेंटच्या शिक्षणाऐवजी गावातील शाळेत शिकविण्याची मानसिकता पालकांच्या मनात येणे अत्यंत गरजेचे झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)