शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१२ वीचे केंद्र पूर्ववत सुरू ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:28 IST

येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात असलेले १२ वीच्या परीक्षेचे केंद्र (क्रमांक ७७०) पुन्हा सुरू करण्यात यावे अशी मागणी कॉँग्रेस अनुसूचीत जाती विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी कॉँगे्रेसने मंगळवारी (दि.२२) तिरोडाचे तहसीलदार संजय रामटेके यांना निवेदन दिले आहे.

ठळक मुद्देकॉँग्रेस अनु. जाती विभागाची मागणी : तहसीलदारांना मागणीचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसुकडी-डाकराम : येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात असलेले १२ वीच्या परीक्षेचे केंद्र (क्रमांक ७७०) पुन्हा सुरू करण्यात यावे अशी मागणी कॉँग्रेस अनुसूचीत जाती विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी कॉँगे्रेसने मंगळवारी (दि.२२) तिरोडाचे तहसीलदार संजय रामटेके यांना निवेदन दिले आहे.निवेदनात, मागील ३- ४ वर्षापासून येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वीच्या परीक्षेचे केंद्र (क्रमांक ७७०) सुरु होते. मात्र राजकीय दबावामुळे ते बंद करण्यात आले आहे. सुकडी-डाकराम हे क्षेत्र नक्षलग्रसत आणि आदिवासी बहूल क्षेत्र असून येथे १५ ते २० किमी. अंतरावरील मंगेझरी, कोडोबर्रा, घोटी, गोविंदपूर, बोलदकसा, कचाटोला, रुस्तमपूर, इंदोरा, निमगाव, आलेझरी, बालापूर या गावातील आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, गरीबांची मुले शाळेत येतात. मुले-मुली सकाळी ७ वाजतापासून निघत असून रात्री ७ वाजता घरी पोहोचतात.हा परिसर व्याघ्र अभयारण्याला लागून असल्यामुळे नेहमी वाघ, बिबट, अस्वल, रानडुकर यासारखे हिंसक प्राणी रस्त्यावर येत असतात. त्यामुळे आपला जीवन मुठीत घेऊन हे विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. येथील परीक्षा केंद्र बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, शारीेरिक व मानसिक व आर्थिक नुकसान होत आहे. सदर विद्यार्थ्यांना दुसरे केंद्र दिले तर मोठ्या प्रमाणात त्रास होणार. करिता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दखल घेऊन येथील परीक्षा केंद्र (क्रमांक ७७०) पूर्ववत ठेवावे असे नमूद आहे. तसेच दोन दिवसांत परीक्षा केंद्राचा सकारात्मक निर्णय न घेतल्यास तिरोडा तालुका काँग्रेस अनु. जाती विभागाच्यावतीने आंदोलन करण्यात येणार असा इशारा देण्यात आला असून निवेदन मंगळवारी (दि.२२) तहसीलदार रामटेके यांना देण्यात आले आहे.