शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अवमानना

By admin | Updated: June 17, 2016 02:09 IST

महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने

वनविकास महामंडळ : नऊ महिन्यांपासून पाचव्या वेतन आयोगाची थकबाकी गोंदिया : महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ३ सप्टेंबर २०१५ रोजी दिला होता. तसेच शासन निर्णयानुसार सदर निधी सहा ते नऊ महिन्यांच्या महामंडळाच्या निधीतून देणे अपेक्षित होते. मात्र या प्रकाराला आता नऊ महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लोटूनही सदर थकबाकी देण्यात आली नाही. प्राप्त माहितीनुसार, महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकाने न्यायालय निर्णय दिनांकापासून २ जून २०१६ च्या आत पाचव्या वेतन आयोगाची १ जानेवारी १९९६ ते ३१ मार्च २००४ या काळातील थकबाकी द्यावी, असा आदेश आहे. मात्र ही थकबाकी नऊ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही देण्यात आली नाही. त्यामुळे न्यायलयीन निर्णयाची अवमानना महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक करीत असल्याचे दिसून येते. न्यायालयीन निर्णयानुसार महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगाची थकबाकी अविलंब ३० जूनपर्यंत द्यावी. अन्यथा पुढील न्यायालयीन कार्यवाही करण्यात येईल. तसेच अधिक विलंब केल्यास विलंबाच्या रमकेच्या व्याजाची भरपाई त्यांना करावी लागेल, असा इशारा सेवानिवृत्त वनपाला डी.बी. भावे व वनविकास महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)