शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषित बालकांना दूषित अंड्यांचा पुरवठा

By admin | Updated: July 11, 2015 02:00 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील अंगणवाडी केंद्रामध्ये कुपोषित बालकांना दूषित अंडी देत असल्याची बाब पालकांनी उघड केली आहे.

पालकाची तक्रार : पदाधिकाऱ्यांकडून कानउघाडणीपांढरी : सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील अंगणवाडी केंद्रामध्ये कुपोषित बालकांना दूषित अंडी देत असल्याची बाब पालकांनी उघड केली आहे. या प्रकरणी जबाबदार संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.सविस्तर वृत्त असे की, ८ जुलैला राजेंद्र शिवणकर रा.पांढरी यांची मुलगी हर्षी हिला सदर अंगणवाडी केंद्रामध्ये शिक्षणासाठी पाठविण्यात आले. ती जन्मापासूनच कुपोषित म्हणून गणल्या जात आहे. येथील अंगणवाडी सेविकेने त्या बालकांना उकडलेले अंडे दिले होते. त्या बालकांनी ते अंडे घरी नेऊन खाण्यास घेतले असता त्यामधून मेलेले कोंबडीचे पिल्लू निघाले. याची माहिती पालकांना कळताच त्यांनी मोहल्ल्यातील महिलांना घेवून पोलीस पाटील व सरपंच यांच्याकडे तक्रार दिली. परंतु त्या व्यक्तींनी त्यांच्याकडे लक्ष न देता कसलीही कारवाई अथवा प्रकरणाची शहानिशा केली नाही. दुसऱ्या दिवशी अंगणवाडी केंद्र सुरू झाल्यावर येथील अंगणवाडी सेविका व या परिसरातील सुपरवाईजर आल्या असताना त्यांच्यासमोर सेविकेची कानउघडणी करण्यात आली. असे प्रकरण घडत राहिल्यास चिमुकल्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ही अंडी कोणी पुरविली होती. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. चिमुकल्या मुलांविषयी संबंधित विभागाने कारवाई करून आहाराचा पुरवठा करणाऱ्यावर कारवाई करावी आणि याची चौकशी व्हावी, अशी मागणी कयादू राजेंद्र शिवणकर, वंदना मधुकर चौधरी, हेमलता राजेंद्र कोरे, योगीता फुंडे, लक्ष्मी खांदारे यांनी केली आहे. (वार्ताहर)