शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील गोरेलाल चौक परिसरात कंटेन्मेंट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 05:00 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला असून, दु:खाची बाब म्हणजे कोरोनामुळे दररोज रुग्णांचा जीव जात आहे. यामुळेच मंगळवारपर्यंत मृतांची संख्या २४५ पर्यंत पोहोचली असून, क्रियाशील रुग्णांची संख्या ५३६२ एवढी झाली आहे. विशेष म्हणजे, यातील ४०८९ रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत; मात्र अलगीकरणात असताना कित्येकांकडून नियमांचे पालन केले जात नसून, त्यांच्यापासून अन्य व्यक्तींना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता टाळता येत नाही.

ठळक मुद्देजिल्ह्यात ४कंटेन्मेंट झोनची भर : आता झाले १४ कंटेन्मेंट झोन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आता जिल्ह्यात कंटेन्मेंट झोन संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्ह्यात मंगळवारचा (दि.१३) सोडून दिल्यानंतर बुधवारी (दि.१४) आणखी ४ कंटेन्मेंट झोनची भर पडली आहे. विशेष म्हणजे, यात शहरातील गोरेलाल चौक परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने हा परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये टाकण्यात आला आहे. तर शहरातील गड्डाटोली परिसरातही कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला असून, दु:खाची बाब म्हणजे कोरोनामुळे दररोज रुग्णांचा जीव जात आहे. यामुळेच मंगळवारपर्यंत मृतांची संख्या २४५ पर्यंत पोहोचली असून, क्रियाशील रुग्णांची संख्या ५३६२ एवढी झाली आहे. विशेष म्हणजे, यातील ४०८९ रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत; मात्र अलगीकरणात असताना कित्येकांकडून नियमांचे पालन केले जात नसून, त्यांच्यापासून अन्य व्यक्तींना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता टाळता येत नाही. अशात अधिकाधिक रुग्ण असलेल्या परिसरांना आता कंटेन्मेंट झोन केले जात आहे. यानुसार, जिल्ह्यात आतापर्यंत ४० कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले असून, दररोज बाधितांच्या वाढत्या संख्येनुसार त्यामध्ये वाढ केली जात आहे. मागील ४-५ दिवसांपासून दररोज कंटेन्मेंट झोनमध्ये वाढ होत असतानाच मंगळवारी वाढ न झाल्याने थोडाफार दिलासा मिळाला होता; मात्र बुधवारी जिल्ह्यात आणखी ४ कंटेन्मेंट झोनची भर पडली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गोरेलाल चौक परिसराला कंटेन्मेंट झोनमध्ये टाकण्यात आले असून, येथे ११ रुग्ण आहेत. शिवाय शहरातील गट्टाडोली परिसरालाही कंटेन्मेंट झोनमध्ये टाकण्यात आले असून, तेथे १६ रुग्ण आहेत. तर लगतच्या ग्राम कारंजा येथे व देवरी तालुक्यातील मोहगाव येथे कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहे. मागील आठवडाभरात सातत्याने दररोज ६००-७०० बाधितांची भर पडत असल्याने त्यानुसार कंटेन्मेंट झोनही वाढत चालले आहे.  

शहरात आता १२ कंटेन्मेंट झोन  शहरात वाढत चाललेल्या बाधितांच्या संख्येमुळे आता १२ कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, लगतच्या ग्राम कारंजा व फुलचूरपेठ येथेही कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहे. मात्र बाजारातील गोरेलाल चौक परिसरात रुग्ण आढळून तो परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये टाकण्यात आल्याने आता एकच खळबळ माजली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये आहेत ६६२ रुग्ण nजिल्ह्यात आतापर्यंत ४४ कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील सर्वाधिक १२ कंटेन्मेंट झोन असून, उर्वरितांमधील काही गोंदिया तालुकासह अन्य तालुक्यांतील आहेत. या ४४ कंटेन्मेंट झोनमध्ये एकूण ६६२ रुग्ण असल्याची माहिती आहे. एवढ्या मोठ्या संख्येत एका-एका परिसरात रुग्ण निघत असल्याने आता परिस्थिती गंभीर झालेली दिसत आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या