शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

वजन काटा विक्रेत्याला ग्राहक न्यायमंचचा झटका

By admin | Updated: December 10, 2014 23:00 IST

वजन काटा खरेदी केल्यावर त्यात बिघाड झाला. बिघाड दुरूस्त करण्यासाठी ग्राहकाने वारंवार दुकानदाराला विनंती केली. मात्र त्याने दुर्लक्ष केल्याने ग्राहकाने ग्राहक तक्रार निवारण

गोंदिया : वजन काटा खरेदी केल्यावर त्यात बिघाड झाला. बिघाड दुरूस्त करण्यासाठी ग्राहकाने वारंवार दुकानदाराला विनंती केली. मात्र त्याने दुर्लक्ष केल्याने ग्राहकाने ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात धाव घेतली. मंचाने आपल्या न्यायनिवाड्यात नुकसान भरपाईसह वजन काट्याची किंमत त्या ग्राहकाला परत करण्याचे आदेश देऊन दिलासा दिला आहे.सडक/अर्जुनी तालुक्याच्या फुटाळा येथील रहिवासी चत्रुगण गणपत ब्राह्मणकर असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. त्यांचे गावातच किराणा दुकान आहे. त्यांनी गोंदियाच्या देशबंधू किर्ती इंन्टरप्रायजेसचे संचालक मुकेश भोजवानी यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक वजन काटा ७ जानेवारी २०१३ रोजी चार हजार ५०० रूपयांत खरेदी केला. २० फेब्रुवारी २०१३ रोजी त्यात बिघाड झाल्याचे त्यांनी दूरध्वनीवरून कळविले. मात्र भोजवानी यांनी दखल घेतली नाही आणि वजन काटा दुरूस्तही करून दिला नाही. यानंतर ग्राहक ब्राह्मणकर यांनी त्यांना पत्र पाठवून दुरूस्तीची मागणी केली, तसेच वैधमापन शास्त्र यांनासुद्धा पत्र पाठविले. मात्र दखल घेण्यात न आल्याने त्यांनी १२ हजार ५०० रूपये नुकसानभरपाई मिळावी म्हणून ९ आॅक्टोबर २०१३ रोजी न्यायमंचात तक्रार दाखल केली. मंचामार्फत नोटीस पाठविल्यावर किर्ती इंटरप्रायजेसचे संचालक भोजवानी यांनी हजर होवून लेखी जबाब नोंदविला. त्यात ग्राहक ब्राह्मणकर यांनी ७ जानेवारी २०१३ रोजी ३० किलो क्षमतेच्या वजन काट्याची तोंडी मागणी चार हजार ५०० रूपयांत केली होती. त्याआधारे एक हजार ४५० रूपयांचा जुना वजन काटा व एक हजार ५० रूपये रोख दिले होते. उर्वरित दोन हजार रूपये १६ जानेवारी २०१३ रोजी देण्याचे ठरले होते. मात्र त्या दिवशी रूपये न देता त्यांनी २६ जानेवारी २०१३ रोजी दिले. त्यानंतर बिघाड झाल्याचे कळविल्यावर दुकानातील अभियंत्याला १२ जानेवारी व १५ फेब्रुवारी २०१३ रोजी दुरूस्तीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र बाह्मणकर एकदा शेतात तर दुसऱ्यांदा बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांना दूरध्वनीवरून काटा प्रयोग शाळेत आणल्यावरच दुरूस्त होईल किंवा रक्कम परत करण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्रयोगशाळेत काटा आणलाच नाही, असे म्हटले. दोन्ही पक्षांची कागदपत्रे व युक्तीवाद ऐकून न्यायमंचाने कारणमिमांसा केली. ब्राह्मणकर यांनी दुरूस्तीची मागणी केल्यावरही मागणी पूर्ण करण्यात आली नाही. शिवाय ते अपंग असल्यामुळे कुठे जावू शकत नाही. यावरून किर्ती इंदरप्रायजेसने सर्व प्रकारे टाळाटाळ करून न्यूनतापूर्ण अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केला. शिवाय अभियंत्याला तक्रारकर्ते ब्राह्मणकर यांच्या घरी वजनकाटा दुरुस्तीसाठी पाठविले, ही बाब सिद्ध करण्यासाठी किर्ती इंटरप्रायजेसने अभियंत्याचे शपथपत्र किंवा कोणतेही दस्तऐवज आदी पुरावे दाखल केले नाही. त्यामुळे सेवेतील त्रुटी सिद्ध होत असल्याचे न्यायमंचाने सांगितले.यावर न्यायमंचाने ग्राहक ब्राह्मणकर यांची तक्रार अंशत: मान्य करून इलेक्ट्रानिक वजन काटा परत घ्यावा व त्याची किंमत चार हजार ४५० रूपये त्यांना द्यावे, तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसानभरपाई म्हणून तीन हजार रूपये द्यावे व तक्रारीचा खर्च म्हणून दोन हजार रूपये ३० दिवसांच्या आत द्यावे, असा आदेश ग्राहक न्यायमंचाने किर्ती इंटरप्रायजेसच्या संचालकांना दिला आहे. (प्रतिनिधी)