शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकावर शौचालय बांधकाम करा

By admin | Updated: June 20, 2017 00:56 IST

दरमहा कोट्यवधी रूपये रेल्वेला देत असलेल्या प्रवाशांना मात्र रेल्वे स्नाथकावरील प्रवासी सुविधांच्या अभावाचा सामना करावा लागत आहे.

ड्रामाने केली मागणी : स्थानकावर प्रवासी सुविधांचा अभाव लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दरमहा कोट्यवधी रूपये रेल्वेला देत असलेल्या प्रवाशांना मात्र रेल्वे स्नाथकावरील प्रवासी सुविधांच्या अभावाचा सामना करावा लागत आहे. स्थानकावर शौचालयांची (मुत्रीघर) कमतरता असल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर शौचालयांचे बांधकाम करून सोबतच प्रवासी सुविधा वाढविण्याची मागणी डेली रेल्वे मुवर्स असोसिएशनने (ड्रामा) केली आहे. आजघडीला येथील रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ३ व ४ वर फक्त दोनच शौचालय असून तेही पूर्व व पश्चिम दिशेच्या कोपऱ्यावर. फलाट क्रमांक ५ व ६ वर फक्त एकच शौचालय आहे. याशिवाय आणखी दोन शौचालय असून त्यात प्रवासी जाऊ शकत नाही. काही दिवसांपूर्वी नागपूर विभागाचे डिआरएम अग्रवाल व वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सिब्बल यांच्याकडे खासदार नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा विषय ड्रामाचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी मांडला. यावर त्यांनी नवे शौचालय बांधकाम करावयाचे नसल्याचे उत्तर दिले. माहितीनुसार, भारतीय रेल्वे अधिनियमांतर्गत येथील रेल्वे स्थानकावर किमान १५ तिकीट खिडक्या, प्रत्येक फलाटावर पीण्याच्या पाण्याचे १२ नळ, प्रत्येक फलाटावर १०० स्क्वेयर मीटरचे प्रतिक्षालय, प्रत्येक फलाटावर १० शौचालय व १०० खुर्च्या असव्यात. येथे मात्र प्रशासनाकडून फक्त पैसा वसूल केला जात असून प्रवाशांना सुविधांपासून वंचीत ठेवले जात आहे. छत्तीसगड मधील गेवरारोड, कोरबा, रायगड, बिलासपूर, रायपूर, दुर्ग, डोंगरगड या रेल्वे स्थानकांचा भरपूर विकास झाला आहे. येथून सुमारे १०० गाड्या दररोज सुटत आहेत. तर दुसरीकडे मात्र विदर्भ तहानलेलाच सोडण्यात आला आहे. रेल्वे स्थानकावर प्रवासी सुविधा वाढविण्यात याव्या अशी मागणी ड्रामाचे सचिव अशोक शर्मा, कोषाध्यक्ष जितेंद्र परमार, रेल्वे कमिटी सदस्य मेहबूब हिरानी, प्रकाश तिडके, विष्णू शर्मा, राजेश बंसोड आदिंनी केली आहे.