चौकशीची मागणी : उसरागोंदी येथील प्रकारआमगाव (दिघोरी) : उसरागोंदी येथे अंगणवाडीच्या सुरक्षा भिंतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून या बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.१३ वे वित्त आयोगांतर्गत ४,१२,३५४ रुपये किमतीेचे बांधकाम मंजुर झाले आहे. त्यानुसार ग्रामपंचायत टेकेपार हे काम करीत आहे. या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनास आले असता ग्रामपंचायत सदस्य रवी तिरपुडे यांनी हे काम चांगल्याप्रकारे करण्याचा सुचना दिल्या मात्र कामामध्ये सुधारणा होत नसल्याने याबाबतची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली.तक्रारीनुसार हे बांधकाम अभियंताच्या संगणमताने ग्रामपंचायत करीत असल्याचा आरोप करण्यात आाल. तसेच येथे बांधण्यात आलेल्या अंगणवाडीचे काम निकृष्ट दर्जाचे असून पहिल्याच वर्षीच्या पावसात ती गळू लागली. त्यामुळे या कामाची योग्य चौकशी होऊन बांधकाम मजबूत होण्याची मागणी मुख्य. कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीवरुन ग्राम पंचायत सदस्य रवि तिरपुडे, संगीता मडामे, कुंदा शामकुंवर, वर्षा ढोमणे यांनी केली आहे. (वार्ताहर)
सुरक्षा भिंतीचे बांधकाम निकृष्ट
By admin | Updated: November 2, 2015 01:31 IST