शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलांचे बांधकाम केवळ कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 21:57 IST

पंतप्रधान आवास योजनेतंर्गत लाभार्भ्यांना घरकूल मंजूर करुन त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. मात्र यापैकी बऱ्याच लाभार्थ्यांनी निधीची उचल करुन घरकुलांचे बांधकाम केले नसल्याची धक्कादायक बाब पंचायत समितीने केलेल्या सर्वेक्षणात उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देपंचायत समितीच्या सर्वेक्षणात उघड : लाभार्थ्यांना बजाविली नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंतप्रधान आवास योजनेतंर्गत लाभार्भ्यांना घरकूल मंजूर करुन त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. मात्र यापैकी बऱ्याच लाभार्थ्यांनी निधीची उचल करुन घरकुलांचे बांधकाम केले नसल्याची धक्कादायक बाब पंचायत समितीने केलेल्या सर्वेक्षणात उघडकीस आली आहे.गोरगरीब लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकारण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतंर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यानंतर घरकुल बांधकामाकरिता दोन टप्प्यात रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. मात्र गोंदिया पंचायत समितीने ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करुन त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली. त्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केले त्यांचे सर्वेक्षण पंचायत समितीने नुकतेच केले असता धक्कादायक बाब उघडकीस आली. अनेक लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामाची दोन टप्प्यातील रक्कम उचलूनही बांधकाम केले नसल्याचे आढळले. त्यामुळे पंचायत समितीने या लाभार्थ्यांना नोटीस बजावून घरकुल बांधकामाकरिता बँक खात्यात जमा केलेली रक्कम व्याजासह परत करण्यास सांगितले आहे.लाभार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. लाभार्थ्यांच्या हातात नोटीस पडताच काहींनी बांधकाम सुरू केल्याची माहिती आहे. तर काही लाभार्थ्यांनी दोन हप्त्याची रक्कम उचलूनही अर्धवट बांधकाम केल्याचे सर्वेक्षण दरम्यान उघडकीस आले. शासनाने गोरगरीब लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकारण्यासाठी अनुदान दिले. मात्र त्याचा योग्य उपयोग होत नसल्याने प्रशासन यासंदर्भात काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गोंदिया तालुक्यात ३५० वर लाभार्थीपंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुल बांधकामासाठी निधीची उचल करुनही बांधकाम न करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ३५० च्यावर आहे. या लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी ३० ते ३५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. मात्र त्यांनी बांधकाम न केल्याने त्यांना पंचायत समितीने नोटीस बजाविल्याची माहिती आहे.मोठा घोटाळा पुढे येण्याची शक्यतापंतप्रधान आवास योजनेतंर्गत जिल्ह्यातील ३० ते ४० हजार घरकुल मंजूर करण्यात आले. त्यासाठी पहिल्या आणि दुसºया टप्प्यातील निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. पण बऱ्याच लाभार्थ्यांनी निधीची उचल करुन काहीच बांधकाम केले नसल्याची बाब गोंदिया तालुक्यात उघडकीस आली. त्यामुळे असेच सर्वेक्षण जिल्हाभरात केल्यास मोठा घोळ समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.निधीची उचल करुनही घरकुलाचे बांधकाम न करणाऱ्या जवळपास ३५० लाभार्थ्यांना आत्तापर्यंत नोटीस बजाविण्यात आली आहे. घरकुल बांधकामासाठी दिलेल्या निधीचा योग्य उपयोग व्हावा हाच शासनाचा उद्देश आहे.- डॉ.एस.के.पानझाडे,खंडविकास अधिकारी गोंदिया.