शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

इमारतीचे बांधकाम निकृष्ट

By admin | Updated: December 10, 2015 02:03 IST

तालुक्यातील जिल्ह्याच्या सिमेवरील सावरला गावात परिसरातील लोकांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले.

सावरला येथील प्रकार : ग्रामपंचायतची तक्रारपवनी : तालुक्यातील जिल्ह्याच्या सिमेवरील सावरला गावात परिसरातील लोकांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले. ग्रामस्थांचे पुढाकाराने इमारत बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. शासनाने आरोग्य केंद्र व कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी निधीची तरतूद करून देवून इमातरीचे बांधकाम सुरू केले. परंतु काम करणाऱ्या यंत्रणेच्या दोषामुळे इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले व उर्वरित काम देखील तसेच होत आहे, अशी तक्रार ग्रामपंचायत सावरलातर्फे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा यांचेकडे करण्यात आलेली आहे.अड्याळ विधानसभेचे तत्कालीन आमदार बंडूभाऊ सावरबांधे यांचे प्रयत्नामुळे सावरला सारख्या दुर्गम भागास शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजूरी प्रदान केली. ग्रामस्थांनी पुढाकार घेवून आरोग्य केंद्रासाठी तात्पुरत्या स्वरूपात ग्रामपंचायतच्या मालकीची इमारत दिली व नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. शासनाने इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने इमारतीचे काम सुरू झाले. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याने कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करीत आहे. गेल्या पावसाळ्यात पूर्ण झालेल्या इमारतीचे स्लॅप गळल्याची तक्रार करण्यात आली परंतू यंत्रणेने तक्रारीची दखल घेतलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतने मासिक सभेच्या ठरावानिशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व जिल्हा परिषद अध्यक्ष यांचेकडे निकृष्ठ बांधकामाची तक्रार केलेली आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)