शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मनोहर चौकात आंबेडकर प्रवेशद्वाराचे बांधकाम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 21:31 IST

शहरातील प्रमुख व प्रसिद्ध मार्ग असलेल्या मनोहर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे बांधकाम करण्यात यावे,...

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील प्रमुख व प्रसिद्ध मार्ग असलेल्या मनोहर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे बांधकाम करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन नगराध्यक्ष अशोक इंगळे व मुख्याधिकारी चंदन पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने देण्यात आले.पूर्वीच्या नगर परिषद पदाधिकाºयांनी १४ जुलै २०१४ रोजी आमसभा घेवून प्रस्ताव क्रमांक २१ मध्ये सदर प्रवेशद्वार मंजूर केले होते. त्याकडे या वेळी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, कर्मचारी संघटन, बौद्ध सामूहिक विवाह समिती, सामान्य कार्यकर्ते, स्मारक समितीचे अध्यक्ष पी.एस. फुले, सामाजिक कार्यकर्ते अरूण गजभिये, सुरेंद्र खोब्रागडे, अ‍ॅडव्होकेट्स महिला मंडळ आदींनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयांचे लक्ष वेधले.या वेळी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी निवेदन स्वीकार केले व चर्चा केली. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक अस्थिकलश परिसराचे सौंदर्यीकरण केल्यास शहराचे नाव उंचावेल. जवळ पांगोली नदीचे पात्र असून अनेक मोठ्या शाळा स्थापित झाल्या आहेत. अ‍ॅड.ए.बी. बोरकर यांनी स्थळाचे महत्व व शहराच्या सौंदर्यीकरणाबाबत पटवून दिले. शहरातील एकमेव मनोरम व पवित्र स्थळ जनतेसाठी, विद्यार्थ्यांसाठी, बौद्ध सामूहिक विवाहासाठी व इतर कार्यक्रमांसाठी उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले.यावर चर्चेअंती मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार, शहराची शान व आंबेडकरी जनतेची मागणी लक्षात घेता प्रस्ताव मंजूर करून बांधकामाची अंमलबजावणी करणे भाग आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक अस्थिकलश परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी नगर परिषद पुरेसा फंड उपलब्ध करेल, असे आश्वासन दिले.याप्रसंगी सभापती भावना कदम, पंकज यादव यांनी पुरजोर सहमती दर्शविली. या वेळी रमेश ठवरे, जी.पी. ढवळे, अ‍ॅड. रंगारी, अ‍ॅड. भौतिक, अ‍ॅड.ए.बी. बोरकर, अ‍ॅड. सचिन बोरकर, अ‍ॅड. वंजारी, अ‍ॅड. शैलेंद्र गडपायले, समिती अध्यक्ष पी.एस. फुले, अरूण गजभिये, सुरेंद्र वासनिक, शोभा बन्सोड, विकास शेंडे, विजय उके, एन.टी. बोरकर, सावजी मेश्राम, पांडुरंग गजभिये, हुसेन मेश्राम, भुपेंद्र वैद्य, उमराव वानखेडे, सूर्यवंशी कमलेश वासनिक, सुरेंद्र बोरकर, मंगेश बावणकर, प्रभुदास नागदेवे, अनिकेश भिमटे, अनुनाथ भिमटे, कुंवर वैद्य, भिमराव राऊत, धर्मेंद्र रंगारी, दुलीचंद मेश्राम, राजेंद्र बन्सोड, बेला नंदागवळी, मनू उके, शीला मेश्राम, नादीराम महंती आदी उपस्थित होते.