गोंदिया : समाजात आपल्या उल्लेखनीय कार्यातून, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय नि:स्वार्थी सेवा देणाऱ्यांना येथील संविधान मैत्री संघ व मित्र संघटनांच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘संविधान मित्र’ पुरस्काराचे प्रजासत्ताकदिनी वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला सामाजिक न्याय विभागातील महात्मा फुले मागासवर्गीय विकास महमंडळाचे जिल्हा व्यवस्थापक विनोद ठाकूर, ‘बार्टी’चे नागपूर विभागीय व्यवस्थापक हृदय गोडबोले, समतादूत करुणा मेश्राम, शारदा कळस्कर, संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे, प्रा. डॉ. दिशा गेडाम, महेंद्र कठाने, डॉ. राजेंद्र वैद्य, सर्व समाज जयंती समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम मोदी, मुस्लिम मॉयनॉरिटी ट्रस्टचे महताब खान, ज्येष्ठ नागरिक वसंत गवळी, अवंतीआई लोधी महासभेचे शिव नागपुरे, समता सैनिक दलचे राजहंस चौरे, माणिक गोंडाणे, माधुरी पाटील, आदेश गणवीर, लक्ष्मी राऊत, आभा मेश्राम, बबिता भालाधरे, किरण वासनिक प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी माणिक गेडाम यांना ‘पत्रकार रत्न’ पुरस्कार, प्रा. विनोद माने यांना ‘शिक्षण सेवा रत्न’ पुरस्कार, अनिल गोंडाणे यांना ‘आरोग्य रत्न’ पुरस्कार, शब्बीर पठाण यांना ‘प्रबोधन रत्न’ पुरस्कार, मुन्ना नंदागवळी यांनी ‘साहित्य रत्न’ पुरस्कार, हरिश्चंद्र लाडे यांना ‘कला रत्न’ पुरस्कार, उमा गजभिये यांना ‘महिला रत्न’ पुरस्कार, अशफिया रसूल शेख या विद्यार्थिनीला ‘बालरत्न’ पुरस्कार, अशोक मेश्राम यांना ‘क्रीडा रत्न’ पुरस्कार, योगेश रामटेके यांना ‘समता रत्न’ पुरस्कार, आनंद बोरकर यांना ‘न्याय रत्न’ पुरस्कार, जयेश रमादे यांना ‘रोजगार सेवा रत्न’ पुरस्कार, पाटलीपुत्र बुद्धविहार महिला मंडळाला ‘समाजसेवा रत्न’ पुरस्कार, ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाला ‘ज्येष्ठ नागरी रत्न’ पुरस्कार, चेतना रामटेककर यांना ‘युवा रत्न’ पुरस्कार, चंद्रशेखर तिरपुडे यांना ‘समाज रत्न’ पुरस्कार, विजू उके यांना ‘संविधान मित्र’ पुरस्कार स्वरूप स्मृतिचिन्ह, संविधान ग्रंथ व शाल प्रदान करून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ओबीसी समाजात शैक्षणिक व समाजजागृती केल्याबद्दल अवंतीआई लोधी महासभाचे शिव नागपुरे, भाईचारा बंधुत्व जपणारे मुस्लिम मायनॉरिटी ट्रस्टचे महताब खान यांचा संविधान ग्रंथ व प्रास्ताविका छायाचित्र देऊन गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमात सामूहिकरीत्या राष्ट्रगीत व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. सामाजिक न्याय विभाग व ‘बार्टी’तर्फे संविधान मैत्री संघाच्या जनजागर कार्याचा संविधान साहित्य देऊन गौरव करण्यात आला. प्रा. डॉ. गेडाम यांनी संचालन केले. सतदेवे यांनी प्रास्ताविक केले. महेंद्र कठाने यांनी आभार मानले.