शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दिलासा... रब्बीतील चुकाऱ्यांसाठी मिळाला 418 कोटी रुपयांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 05:00 IST

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामात धानखरेदी केली जाते. यंदा रब्बी हंगामात दोन्ही विभागाने जवळपास ३५ लाख क्विंटल धानखरेदी केली होती. मात्र, मागील दोन महिन्यांपासून रब्बीतील धानाचे चुकारे थकले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम संकटात आला होता.

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रब्बी हंगामातील धानाच्या थकीत चुकाऱ्यांसाठी शासनाने ४१८ कोटी रुपयांचा निधी मार्केटिंग फेडरेशनला शुक्रवारी (दि.२०) उपलब्ध करून दिला. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून चुकाऱ्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रब्बीतील चुकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांची झालेली आर्थिक कोंडी लक्षात घेता खा. प्रफुल्ल पटेल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर शासनाने चुकाऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातूनखरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामात धानखरेदी केली जाते. यंदा रब्बी हंगामात दोन्ही विभागाने जवळपास ३५ लाख क्विंटल धानखरेदी केली होती. मात्र, मागील दोन महिन्यांपासून रब्बीतील धानाचे चुकारे थकले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम संकटात आला होता. शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली होती. शेतकऱ्यांची झालेली आर्थिक कोंडी लक्षात घेत शेतकऱ्यांना त्वरित चुकाऱ्याची रक्कम मिळावी, यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून माजी आ. राजेंद्र जैन, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. राजू कारेमोरे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. यानंतर खा. पटेल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन चुकाऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्याचीच दखल अन्न नागरी पुरवठा विभागाने शुक्रवारी रब्बीतील धानाच्या चुकाऱ्यांसाठी ४१८ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. तसेच हा निधी मार्केटिंग फेडरेशनकडे वर्ग केला. त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर धानाचे चुकारे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खा.प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले आहे. 

पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा- ब्बी हंगामात सर्वाधिक धानखरेदी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात केली जाते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत धानखरेदी केली जाते. रब्बीतील धानाच्या चुकाऱ्यांसाठी ४१८ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेलagricultureशेती