शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कॉग्रेसची धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2017 01:40 IST

उत्तरप्रदेशातील शेतकऱ्याचे पिक कर्ज माफ करण्याच्या प्रक्रियेसोबत महाराष्ट्रातील आमगाव-देवरी विधानसभा

निवेदन सादर : कर्जमुक्त करण्याची मागणी देवरी : उत्तरप्रदेशातील शेतकऱ्याचे पिक कर्ज माफ करण्याच्या प्रक्रियेसोबत महाराष्ट्रातील आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज पूर्ण माफ करण्यात यावे, शासनातर्फे घोषीत दुष्काळ निधीचे त्वरीत करावे, सावकारी कर्जमुक्त योजनेची अंमलबजावणी योग्यरित्या करून या क्षेत्रातील शेतकऱ्यांना मदत करावी या मागणीचे निवेदन शनिवार (दि.१) ला येथील उपविभागीय अधिकारी एम.एच.टोणगावकर यांच्या मार्फत राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले. माजी आ. रामरतन राऊत, गोंदिया जिल्हा काँग्रेसतर्फे महासचिव सहषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात शेकडो काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी निवेदन सादर ककेले. सदर निवेदनात काँग्रेस पक्षाने म्हटले आहे की, ज्याप्रमाणे उत्तरप्रदेशातील विधानसभेच्या निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील शेतकऱ्यांचे पीक कर्ज पूर्ण माफ करण्याची घोषणा केली. होती आणि या मुद्यावर उत्तरप्रदेशात सरकार स्थापनेनंतर कर्ज माफ करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातही भाजप प्रणीत पक्षाचे सरकार असल्याने या राज्यात सुध्दा शेतकऱ्याचे पीक कर्ज पूर्ण माफ करावे आणि शासनाद्वारे मागच्या वर्षी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील ८६ गाव दुष्काळग्रस्त घोषीत करून त्यांना मदत करीत असल्याचा गाजावाजा करण्यात आला होता. परंतु ही मदतनिधी आजपर्यंत ८६ गावातील एकाही शेतकऱ्याला मिळाली नाही. दुष्काळ निधीचे त्वरीत वाटप करावे तसेच शासनाने राज्यातील सावकारांच्या तावडीतून शेतकऱ्यांना वाचविण्याकरीता सावकारी कर्जमुक्त योजना सुरू केली. परंतु या योजनेची अंमलबजावणी या विधानसभा क्षेत्रात अद्याप करण्यात आली.या तिन्ही विषयावर शासनाने गंभीररित्या विचार करून येथील शेतकऱ्यांना त्वरीत मदत करावी, अशी मागणी केली. १५ दिवसात सदर मागणी पूर्ण न झाल्यास येत्या दिवसात काँग्रेस पक्षातर्फेतिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात देवरी तालुक्यातील शेकडो काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी माजी आ. रामरतन राऊत, गोंदिया जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे, देवरी तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप भाटीया, जि.प.सदस्य माधुरी कुंभरे, पं.स. उपसभापती संगीता भेलावे, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग, अ‍ॅड. प्रशांत संगीडवार, राधेश्याम बगडीया, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष वसंत पुराम, महासचिव बळीराम कोटवार, नरेश राऊत, धनपत भोयर, उपाध्यक्ष चैनसिंग मडावी, एन.एस.यु.आयचे अध्यक्ष अमित तरजुले, वैभव जैन, अविनाश टेंभरे, संदीप मोहबीया, देवरी एनएसयुआई उपाध्यक्ष उमेश चन्ने, गौतम वैद्य, मानिकाबापू आचले, सोनू नेताम, सुरज गिरी, उमेश धानगाये, दिगंबर चौधरी, ओमराज बहेकार, गणेश भेलावे यांच्यासह देवरी तालुक्यातील शेकडो काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी महिला पुरुषांचा समावेश होता. (प्रतिनिधी)