शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भ व शेतकरी हितासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2016 00:17 IST

जनतेला अच्छे दिन येणार अशी खोटी स्वप्ने दाखवून भाजपाने सत्ता हस्तगत केली. सत्तेत आल्यानंतर भाजपला जनतेचा विसर पडला आहे.

 भाजप शेतकरी विरोधी : नितीन राऊत यांची पत्रपरिषदेत माहिती साकोली : जनतेला अच्छे दिन येणार अशी खोटी स्वप्ने दाखवून भाजपाने सत्ता हस्तगत केली. सत्तेत आल्यानंतर भाजपला जनतेचा विसर पडला आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ व शेतकऱ्यांच्या हितासाठी काँग्रेस आता रस्त्यावर उतरणार असल्याचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी राऊत म्हणाले, ऐन पावसाळ्यात कृषीपंपाचे १६ तासाचे भारनियमन सुरु आहे. त्यामुळे रोवणी खोळंबली असून शेतकऱ्यांना हमी भावही मिळाला नाही. काँग्रेस सरकारच्या काळात अशी वेळ शेतकऱ्यांवर आली नाही. मोदी सरकारने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था केली असून उद्योगपतींना मदत करीत आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याऐवजी उद्योगपतींचे बुडालेले कर्ज शासकीय तिजोरीतून देत आहेत. ज्या जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्ता काबीज केली तीच जनता आता पश्चाताप करीत आहे. भाजपने २०१४ ची निवडणूक स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर लढली. आता केंद्रात व राज्यात त्यांचीच सत्ता आहे. वेगळा विदर्भ का करीत नाही, असा प्रश्न करून ते म्हणाले, एकीकडे भाजपाचे आमदार व खासदार विदर्भाचा प्रस्ताव आणतात तर दुसरीकडे त्यांचेच मुख्यमंत्री मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे असे सांगून दिशाभूल करतात. विदर्भ वेगळा व्हावा ही काँग्रेसची इच्छा असून आता वेगळा विदर्भ व्हावा यासाठी विदर्भातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे. यातून सर्वानुमताचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असून वेगळ्या विदर्भासाठी जनआंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा सचिव डॉ.ब्रम्हाननद करंजेकर, तालुका अध्यक्ष नंदकिशोर समरीत, डॉ.अजय तुमसरे, शहर अध्यक्ष अश्विन नशिने, जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य होमराज कापगते, अशोक कापगते, मंदा गणवीर, पंचायत समिती सदस्य छाया पटले, माजी सरपंच हेमलता परसगडे, माजी सभापती क्रिष्णा मेश्राम, माजी सभापती ताराबाई तरजुले आदी अनेक जण उपस्थित होते.