शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

कॉँग्रेसने गड राखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 21:54 IST

सर्वांच्या नजरा लागून असलेल्या तालुक्यातील आसोली जिल्हा परिषद क्षेत्राच्या पोटनिवडणुकीत कॉँग्रेस पक्षाने आपला गड राखला. निवडणुकीत कॉँग्रेसचे उमेदवार सुरजलाल महारवाडे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार परसराम हुमे यांना ८८४ मतांनी पराजीत करून विजय मिळविला. यामुळे कॉँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देसुरजलाल महारवाडे विजयी : ८८४ मतांनी केले भाजप उमेदवाराला पराजित

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सर्वांच्या नजरा लागून असलेल्या तालुक्यातील आसोली जिल्हा परिषद क्षेत्राच्या पोटनिवडणुकीत कॉँग्रेस पक्षाने आपला गड राखला. निवडणुकीत कॉँग्रेसचे उमेदवार सुरजलाल महारवाडे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार परसराम हुमे यांना ८८४ मतांनी पराजीत करून विजय मिळविला. यामुळे कॉँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.आसोली जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य शेखर पटले यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त होती. या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार परसराम हुमे, कॉँग्रेसचे उमेदवार सुरजलाल महारवाडे, शिवसेनेचे उमेदवार गजानन महारवाडे व अपक्ष उमेदवार ओंकार उके रिंगणात होते. रविवारी (दि.२३) घेण्यात आलेल्या मतदानात ७३.४० टक्के मतदान झाले. निवडणुकीत क्षेत्रातील १२ हजार ८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (दि.२४) येथील प्रशासकीय इमारतीमध्ये पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसचे सुरजलाल महारवाडे यांनी भाजपचे परसराम हुमे यांचा ८८४ मतांनी पराभव केला आहे.निवडणुकीत कॉँग्रेसचे सुरजलाल महारवाडे यांनी सहा हजार २२३, भाजपचे परसराम हुमे यांनी पाच हजार ३३९, शिवसेनेचे गजानन महारवाडे यांनी ३०३ तर अपक्ष उमेदवार ओंकार उके यांनी १०२ मते घेतली.निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार परसराम हुमे तर कॉँग्रेसचे उमेदवार सुरजलाल महारवाडे यांच्यात थेट लढत झाली. तरी शिवसेनेचे उमेदवार यांनी भाजपला मात्र युती धर्म न पाळल्याचा सबक शिकविल्याचे बोलले जात आहे. तर लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतदारसंघातील आघाडीवर सुद्धा या पोटनिवडणुकीने प्रश्न चिन्ह उपस्थित होते.विशेष म्हणजे, मतदान प्रक्र ीया सुरू असताना क्षेत्रातील ग्राम मोरवाही येथे दोन्ही पक्षाच्या गोंदिया येथील कार्यकर्त्यांना बघून गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला होता. निवडणूक अधिकारी व प्रभारी उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक यांनी विजयी उमेदवाराला प्रमाणपत्र दिले.माहुरकुडात भैसारे विजयीलोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील माहुरकुडा पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानात कॉँग्रेसने गड राखला असून पक्षाचे उमेदवार संघदीप भैसारे विजयी झाले. विजयानंतर तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष करून पेढे भरविले.माहुरकुडा पंचायत समिती सदस्य नानाजी मेश्राम यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर येथे रविवारी (दि.२३) निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत महालगाव, तावशी, मोरगाव, निलज, माहुरकुडा, मालकनपूर व सिरोली येथील सात हजार ३५७ मतदारांपैकी चार हजार ७६८ मतदारांनी मतदान केले.मतदानाची टक्केवारी ६४.८१ होती. पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप व बहूजन वंचीत आघाडी या पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरविले होते. यात काँग्रेसचे संघदीप भैसारे यांना एक हजार ९८१, भाजपचे दिनेश शहारे यांना एक हजार ५८७ तर बहूजन वंचित आघाडीचे अजय बडोले यांना एक हजार १५५ मते मिळाली व भैसारे यांचा ३९४ मतांनी विजय झाला.भैसारे यांच्या विजयासाठी जिल्हा परिषद सदस्य गिरीष पालीवाल व तालुकाध्यक्ष भागवत नाकाडे यांनी परिश्रम घेतले. उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे, तहसीलदार विनोद मेश्राम, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सुनील भांडारकर यांनी ही निवडणूक यशस्वीरित्या हाताळली. विशेष म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अर्जुनी-मोरगार तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद क्षेत्रात भाजप आघाडीवर होती. तर केवळ माहुरकुडा जिल्हा परिषद क्षेत्रात काँग्रेसने आघाडी घेतली होती. त्यात या पोटनिवडणुकीतही काँग्रसने आघाडी कायम ठेवत गड राखला.