शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक

By admin | Updated: July 18, 2016 00:11 IST

तिरोडा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्ष बळकट कसे करता येईल, याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव उमाकांत अग्निहोत्री यांनी

गोरेगाव : तिरोडा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्ष बळकट कसे करता येईल, याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव उमाकांत अग्निहोत्री यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. अध्यक्षस्थानी गडचिरोली (आरमोरी) विधानसभा क्षेत्राचे पर्यवेक्षक डॉ. योगेंद्र भगत होते. याप्रसंगी प्रामुख्याने अ‍ॅड.के.आर. शेंडे, डॉ. झामसिंग बघेले, डॉ. नामदेवराव किरसान, पी.जी. कटरे, जगदिश येरोला, मलेशाम येरोला, विशाल शेंडे, सीमा कटरे, ज्योती वालदे, हिरण झंझाड, डेमेंद्र रहांगडाले, ओमप्रकाश कटरे, ससेंद्रकुमार भगत, अ‍ॅड. पृथ्वीराज चव्हाण, अशोक शेंडे, राहुल कटरे व पदाधिकारी उपस्थित होते. तिरोडा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या जिल्हा परिषद क्षेत्र, पंचायत समिती क्षेत्रातील गावांना भेटी देवून गावाच्या समस्या सोडविणे, पक्ष बळकट करण्यासाठी गाव संघटन तयार करणे, तालुक्यात युथ काँग्रेस कमिटी, विद्यार्थी संघटना, महिला काँग्रेस कमिटी तयार करणे व हे संघटन येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीपूर्वी करावयाचे आहे. यासाठी काँग्रेसचे शिपाई म्हणून काम करणार, अशी ग्वाही उमाकांत अग्निहोत्री यांनी बैठकीत दिली. संघटन मजबूत करण्यासाठी दर आठवड्याला जि.प. व पं.स. क्षेत्रनिहाय बैठका घेतल्या जाणार असल्याने सामान्य कार्यकर्त्यात नवसंजीवनी देण्याची कामे पदाधिकारी व नेत्यांना करावयाचे आहेत. काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष आहे. यासाठी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जनआंदोलन करण्यात येणार आहे. दमदार काँग्रेस पक्ष झाल्याशिवाय खासदार, आमदार निवडता येणार नाही. राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्याच नावांनी पक्ष बळकट करण्याचे कार्य सर्व पदाधिकाऱ्यांनी करावे, असे आवाहनसुद्धा तिरोडा विधानसभा क्षेत्र प्रभारी उमाकांत अग्निहोत्री यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना केले. संचालन के.टी. राऊत यांनी केले. आभार सुरेश चन्ने यांनी मानले. बैठकीच्या यशस्वितेसाठी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)