शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

भाजप सरकारवर काँग्रेसचे तोंडसुख

By admin | Updated: August 28, 2015 01:39 IST

केंद्रातील नरेंद्र असो की राज्यातील देवेंद्र, यांची छाती ५६ इंचाची असेल, पण त्यात मोठ्या शरीरात मनाचा मोठेपणा नाही, विश्वास नाही.

गोंदिया : केंद्रातील नरेंद्र असो की राज्यातील देवेंद्र, यांची छाती ५६ इंचाची असेल, पण त्यात मोठ्या शरीरात मनाचा मोठेपणा नाही, विश्वास नाही. विकासाच्या नुसत्याच गप्पा करीत ‘नाटकबाजी’ आणि फोकनाड्या मारणारे हे नेते केवळ शब्दांचे जाळे टाकू शकतात. पण देशाला ‘मन की बात’ नाही, तर ‘कल की बात’ची गरज आहे, अशी घणाघाटी टिका माजी शालेय शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी येथे आयोजित काँग्रेसच्या धरणे आंदोलनातदरम्यान केली.प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा पर्दाफाश करण्यासाठी येथील जयस्तंभ चौकात गुरूवारी हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस नेते वसंत पुरके यांच्यासह माजी आ.रामरतन राऊत, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, माजी मंत्री भरतभाऊ बहेकार, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती सभापती पी.जी. कटरे, विमल नागपुरे, सहेसराम कोरोटे, नामदेवराव किरसान, अशोक लंजे, झामसिंग बघेले, दीपक पवार आदी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.यावेळी माजी मंत्री पुरके यांनी पंतप्रधान मोदींना चांगलेच लक्ष्य केले. ‘विश्वपर्यटक पंतप्रधान’ अशी उपहासात्मक टिका करताना त्यांनी मोदींच्या ‘मेक इन इंडिया, बिलिव्ह इन इंडिया, स्टँड अप इंडिया’ अशा घोषणांची टर उडविली. भाजप सरकारने जनधन योजना, निर्मल ग्राम योजना अशा अनेक जुन्याच योजना नवीन नाव देत समोर केल्या आहेत. या सरकारला खरा विकास करायचा नसून देशाचे भले करण्याची ताकद केवळ काँग्रेसमध्येच असल्याचे ते म्हणाले. मनात दैववाद निर्माण करायचा आणि दिशाभूल करायची हेच विद्यमान सरकारचे ध्येय आहे. आता त्यांनी काहीही केले तरी त्यांना झेलावे लागणार असे पुरके म्हणाले. यावेळी त्यांनी खासदार नाना पटोलेंच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले. आधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजीनामानाट्य करणारे नानाभाऊ आपले ‘मेन्टेनन्स’ झाले नाही तर पुन्हा माघारी फिरतील. पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्याचीच पक्ष किंमत करतो, असे ते म्हणाले. तब्बल पावणेदोन तास प्रा.पुरके यांनी भाषण केल्याने हा सुद्धा चर्चेचा विषय झाला. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अपूर्व अग्रवाल यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)आमदार अग्रवाल यांची अनुपस्थितीया भाजप सरकारच्या निषेध आंदोलनात आमदार गोपालदास अग्रवाल आणि युवक काँग्रेसचे गोंदिया-भंडारा लोकसभा अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय होती. भाजपविरोधातील हे आंदोलन सोडून प्रफुल्ल अग्रवाल कुंभमेळ्याला गेल्याचे ऐकून पुरके यांनी थोडी नाराजीही व्यक्त केली. या अनुपस्थितीचा संबंध आगामी विधान परिषद निवडणुकीशी तर नाही, अशी चर्चा नागरिकांमध्ये होती.ते’ काँग्रेस पदाधिकारी शिक्षेस पात्रगोंदिया जिल्हा परिषद किंवा पंचायत समित्यांमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत केलेल्या हातमिळवणीशी आपण कदापिही सहमत होणार नाही, असे स्पष्टपणे सांगताना विरोधात बसावे लागले तरी चालेल पण तत्वांशी तडजोड योग्यच नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे काँग्रेसचे ते पदाधिकारी शिक्षेस पात्र असल्याचे प्रा.पुरके पत्रकारांशी बोलताना म्हणाले.