शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

राकाँ-काँग्रेसने सरकारची तिजोरी लुटली : बडोले

By admin | Updated: June 26, 2015 01:34 IST

केंद्र व राज्य शासन शेतकरी, मजूर व सर्वसामान्यांकरिता अहोरात्र कार्य करीत आहे.

गोंदिया : केंद्र व राज्य शासन शेतकरी, मजूर व सर्वसामान्यांकरिता अहोरात्र कार्य करीत आहे. मात्र पूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने कोट्यवधीचे घोटाळे करुन शासनाची तिजोरी रिकामी केली. आम्ही घोटाळ्याचे साम्राज्य संपविले व घोटाळेबाजांना तुरुंगात टाकण्याचे काम सुरू केले, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.गोंदिया तालुक्यातील जि.प. व पं.स. निवडणुकीत पक्ष उमेदवारांच्या ठिकठिकाणच्या प्रचार सभेत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, तालुकाध्यक्ष नंदकुमार बिसेन, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जिल्हा महामंत्री संतोष चव्हाण, दिनेश दादरीवाल, भाऊराव उके, संजय कुळकर्णी, शामलाल ठाकरे, राजा बन्सोड, रेखा लिल्हारे आदी उपस्थित होते.ते पुढे म्हणाले, आम्ही सत्तेत आल्यावर आघाडी शासनाने थांबवून ठेवलेली अठराशे कोटी रुपयांची शिष्यवृत्ती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडन येथील घर व इंदू मिलच्या जागेवर डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक बांधण्याचा निर्णय घेवून सर्व प्रक्रिया पार पाडून घेतली. शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असल्याने २५० रुपये प्रतिक्विंटल बोनस देऊन दिलासा दिला. धानाला योग्य भाव देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. रोजगारसाठी भरीव कार्य सरकार करीत आहे. जि.प. ने मागील पाच वर्षात प्रत्येक क्षेत्रात विकास कार्य करुन जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलविला. आता विकासासाठी जि.प. व पं.स.मध्ये सत्ता येणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)