शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या ढिसाळ काराभारावरून गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 23:53 IST

नगर परिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावरून विरोधी पक्षातील सदस्यांसह पालिकेतील सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी सर्वसाधारण सभेत चांगलाच गोंधळ घातला. सायंकाळपर्यंत केवळ मागील इतीवृत्तावरच ही सभा चालली. दरम्यान, सभागृहाच्या एकमताने बुधवारची (दि.१८) सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली.

ठळक मुद्देसर्वसाधारण सभा तहकूब : विरोधकांसह सत्ताधारीही आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावरून विरोधी पक्षातील सदस्यांसह पालिकेतील सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी सर्वसाधारण सभेत चांगलाच गोंधळ घातला. सायंकाळपर्यंत केवळ मागील इतीवृत्तावरच ही सभा चालली. दरम्यान, सभागृहाच्या एकमताने बुधवारची (दि.१८) सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली.जिल्हाधिकाऱ्यांच्या दणक्यानंतर बुधवारी (दि.१८) सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आल्याची माहिती आहे. २५ विषयांना घेऊन बोलाविण्यात आलेल्या या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षातील कॉँग्रेस पक्षाचे सदस्य सुनिल भालेराव, सुनिल तिवारी, क्रांती जायस्वाल तर गोंदिया परिवर्तन आघाडीतील सदस्य पंकज यादव, लोकेश यादव यांच्यासह सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे सदस्य धर्मेश अग्रवाल व बंटी पंचबुद्धे यांनी चांगलाच गोंधळ घातल्याची माहिती आहे.नगर परिषद प्रशासन योग्यरितीने काम करीत नसल्याने नगरसेवकांना शहरवासीयांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप सदस्यांनी केला.विशेष म्हणजे, मागील सभेचे इतिवृत्त या पहिल्या क्रमांकाच्या विषयावरच सायंकाळी ५.३० वाजल्याची माहिती आहे. त्यानंतर मुख्याधिकारी चंदन पाटील यांच्या आजोबांचे निधन झाल्याने त्यांना कळले व त्यांना जावयाचे होते. त्यामुळे ही सभा सभागृहाच्या एकमताने तहकुब करण्याचा निर्णय घेण्यात आला.मोठ्या स्फोटाचे संकेतसत्ताधारी पक्षातील एका सदस्याने सर्वसाधारण सभा होत नसल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यामुळेच १७ महिन्यांच्या कार्यकाळात दुसरी सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.१८) घेण्यात आली. मात्र या सभेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील सदस्यांनीच चांगलाच रोष व्यक्त केल्याची माहिती आहे. यावरून नगर परिषदेचा कारभार किती सुरळीत सुरू आहे, याची प्रचिती या सदस्यांनी आणून देत भाजपला घरचा आहेर दिला. हळूहळू वाढत चाललेला हा रोष मात्र भविष्यातील मोठ्या स्फोटाचे संकेत देत असल्याचेही नगर परिषद वर्तुळात बोलले जाते.